EPFO introduces a faster and hassle-free PF transfer system for employees changing jobs. saam tv
बिझनेस

EPFO PF Transfer: नोकरी बदलली तरी PF ट्रान्सफर होणार विना टेन्शन; फक्त ५ दिवसांत होणार प्रक्रिया पूर्ण

Provident Fund Transfer Process: सतत नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता किती वेळाही नोकरी बदलली तरी तुमचा पीएफ ट्रान्सफर अगदी सहज होणार आहे. EPFO ने कर्मचाऱ्यांसाठी काय निर्णय घेतलाय ? पाहूया एक रिपोर्ट.

Girish Nikam

  • नवीन कंपनीत रुजू होताच जुना PFआपोआप नवीन खात्यात ट्रान्सफर होईल.

  • प्रक्रिया केवळ ३ ते ५ दिवसांत पूर्ण होणार

  • जुन्या कंपनीची मंजुरी आवश्यक नसणार

नोकरी बदलली की अनेक कर्मचा-यांना भविष्य निर्वाह निधी म्हणजेच प्रॉव्हिडंड फंडचं टेन्शन येतं. कारण पीएफ बदलाची सर्व किचकट प्रक्रिया करावी लागते. मात्र आता नोकरी बदलली तरी आपल्या साठलेल्या पैशांची चिंता करण्याची गरज नाही. कारण EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने कर्मचा-यांच्या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेतलाय. एक नवीन प्रणाली सुरु केली आहे. त्यामुळे नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांचा त्रास कायमचा दूर होणार आहे. पाहूया निय़मात काय बदल झाले आहेत ते.

नोकरी बदला, PFची चिंता विसरा

EPFOकडून 'स्वयंचलित हस्तांतरण प्रणाली' सुरू

नवीन कंपनीत रुजू होताच जुना PFआपोआप नवीन खात्यात ट्रान्सफर होणार

हस्तांतरणासाठी फॉर्म 13 किंवा ऑनलाईन अर्जाची गरज नाही

प्रक्रिया केवळ 3 ते 5 दिवसांत पूर्ण होणार

जुन्या कंपनीची मंजुरी आवश्यक नाही

कर्मचाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते पाहूया.

या आवश्यक गोष्टी

तुमचा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) सक्रिय असावा

UAN ला आधार कार्ड लिंक केलेले असावे

कर्मचाऱ्यांचं e-KYC पूर्ण असावे

जुन्या कंपनीने नोकरी सोडल्याची तारीख अपडेट करणे आवश्यक

सतत नोकरी बदलणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. कारण तुम्ही नोकरी बदलली तरी प्रत्येक वेळी पीएफ हस्तांतरणासाठीच्या किचकट प्रक्रियेतून तुमची सुटका होणार आहे. इतकंच काय कर्मचा-यांना अर्जफाटे सुद्धा करावे लागणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladli Behna Yojana: लाडक्या बहिणींचा हप्ता वाढवणार! १५०० नाही तर ₹३००० मिळणार; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Tuesday Puja: मंगळवारी कोणाची पूजा करावी आणि काय अर्पण करावे? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Latur Accident : लातूरमध्ये कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, ४ जण जखमी

Success Story: ४० लाखांच्या पॅकेजची नोकरी सोडली, आधी IPS नंतर IAS; UPSC परीक्षेत पहिले आलेले आदित्य श्रीवात्सव कोण?

SCROLL FOR NEXT