Employees Provident Fund Saam Tv
बिझनेस

PF Rules: नवीन नोकरी जॉइन केल्यावर जुन्या PF खात्याचे काय होणार? वाचा तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

PF Withdrawal Rules: प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. जर नोकरी सोडली तर पीएफ खात्याचं काय होणार? पीएफ खात्यातील पैसे काढायचे कसे? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात असतात.

Siddhi Hande

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमध्ये दर महिन्याला पगारातील काही रक्कम जमा केली जाते. पगारातील १२ टक्के रक्कम ही पीएफ खात्यात जाते. पीएफ खात्यातील गुंतवणूक ही फायदेशीर असते. यावर जास्तीत जास्त व्याजदर दिले जाते. (PF Rules)

पीएफ खात्यात कंपनी आणि कर्मचारी दोघे मिळून पैसे जमा करतात.जर तुम्ही नोकरी सोडली अन् दुसऱ्या कंपनीत जॉइन झालात तर तुम्हाला पीएफ खात्यातील पैसे काढता येणार का? हे पैसे काढण्याी प्रोसेस काय? असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झाले आहेत. तर आज आम्ही तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहे. (EPFO)

पीएफचे नियम (PF Account Rules)

ईपीएफओने पीएफ खात्याबाबत काही नियम तयार केले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने नोकरी सोडली अन् दुसरी नोकरी केली नाही म्हणजेच तो व्यक्ती बेरोजगार आहे. तर हा व्यक्ती पीएफ खात्यातून ७५ टक्के रक्कम काढू शकतो. तसेच जर त्या व्यक्तीला पुढील दोन महिने नोकरी नसेल तर तो व्यक्ती उरलेली २५ टक्के रक्कदेखील काढू शकतो.

नवीन नोकरी जॉइन केल्यावर पीएफ खात्याचे काय करावे?

जर तुम्ही नोकरी सोडली आणि दुसरी नोकरी जॉइन करत असाल तर तुमचा यूएएन नंबर अॅक्टिव्ह असतो. त्यामुळे तुम्ही जुन्या कंपनीतील पीएफ काढू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला पीएफ खाते ट्रान्सफर करावे लागेल.

ऑनलाइन क्लेम कसा करावा?

जर तुम्ही नोकरी सोडली आहे आणि पीएफ काढायचा विचार करत असाल तर ईपीएफ पोर्टलवर जाऊन लॉग इन करावे लागेल. त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसमध्ये क्लेम फॉर्म 31, 19 आणि 10C वर क्लिकर करायचे आहे. त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटचे शेवटचे चार अंक टाकायचे आहेत.यानंतर अंडरटेकिंग फॉर्म भरुन सही करावी लागेल. यानंतर पीएफचा फॉर्म १९ भरावा लागेल. यानंतर तुमचा पत्ता भरावा लागेल. यानंतर तुम्हाला ओटीपी येईल.

तुमचे मोबाईल आणि आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक रेफरेंस नंबर मिळणार आहे. यानंतर तुम्हाला १५-२० दिवसांत पैसे जमा केले जातील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

पुणेकरांनो ऐकलं का! शहरात १० टक्के पाणी कपात; पुणे महापालिकेचा पाणी बचतीसाठी नवीन प्लॅन काय?

Nigdi Crime : मंदिरात अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पुण्यातील निगडीत संताप

SCROLL FOR NEXT