PF News Saam Tv
बिझनेस

लग्नानंतरही PF नॉमिनी म्हणून आई-वडिलांचे नाव बदलावे लागणार नाही; हायकोर्टाने काय निर्णय दिला? वाचा

PF News: पीएफ खात्याचा नॉमिनी बदलायचा असेल तर आता तुम्हाला लेखी अर्ज करावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला कर्मचारी निर्वाह निधी संघटनेकडे अर्ज द्यावा लागणार आहे.

Siddhi Hande

प्रत्येक कर्मचाऱ्याचे पीएफ अकउंट असते. पीएफ खात्यात दर महिन्याला कर्मचाऱ्याच्या अकाउंटमधून काही रक्कम जमा केली जाते.पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता पीएफसाठीचा नॉमिनी हा लग्नानंतरही वैध राहणार आहे. असा निर्णय हायकोर्टाने दिला आहे.

जर लग्नाआधी तुम्ही पीएफ नॉमिनी म्हणून आईचे नाव लावले असेल तर लग्नानंतर ते अवैध ठरत नाही. तुमच्या पीएफ खात्यातील नॉमिनी जर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी लेखी अर्ज द्यावा लागणार आहे. नॉमिनी बदलण्यासाठी लेखी अर्ज द्यावा लागणार असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला आहे.

पीएफ खात्यात दर महिन्याला काही रक्कम जमा केली जाते.पीएफ खात्यातील गुंतवणूक ही सुरक्षित असते. पीएफ खात्यात सर्वाधिक व्याजदर मिळते.ही रक्कम तुम्ही कधीही काढू शकतात. सेवानिवृत्तीनंतर ही रक्कम तुम्हाला मिळते. दरम्यान, पीएफ खात्यासाठी नॉमिनी लावायचा असतो.

जर कर्मचाऱ्याला कधी काही झाले तर पीएफ खात्यातील रक्कम ही नॉमिनीला दिली जाते. पीएफ खात्यात नॉमिनी कोणाला लावायचे असते हे स्वतः कर्मचाऱ्याने ठरवायचे असते. लग्नानंतर जर तुम्हाला नॉमिनी बदलायचा असेल तर लेखी अर्ज सादर करावा लागेल. भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे तुम्ही अर्ज सादर केल्यावर तुमचा नॉमिनी बदलला जाणार आहे. त्यामुळे लग्नानंतर जर बायको किंवा मुलांची नावे नॉमिनी म्हणून लावायचे असतील तर अर्ज सादर करणे गरजेचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: संतापजनक! मुलीने प्रपोज नाकारल्याने हॉटेल मालक संतापला, रिसेप्शनिस्टवर केला बलात्कार

Box Office Collection : 'थामा'च्या कमाईत चौथ्या दिवशी मोठी घसरण; 'एक दीवाने की दीवानियत'नं किती कमावले? वाचा कलेक्शन

हातपाय बांधले अन् गरम चटके; अनैतिक संबंधातून नांदेडच्या तरूणाची कर्नाटकात हत्या

EPFOचा मोठा निर्णय! पेन्शनच्या ५ नियमांत केले बदल; थेट खिशावर होणार परिणाम

Maharashtra Live News Update: एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर, कारण अस्पष्ट

SCROLL FOR NEXT