Provident Fund Navi
बिझनेस

Provident Fund: नोकरी गेली तर PFची रक्कम काढता येते? कोण-कोणत्या कामांसाठी काढता येतात पैसे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

EPF अकाऊंट हे निवृत्तीसाठी असून निवृत्त झाल्यानंतर आपण त्यातून पैसा काढू शकतो. परंतु जर आवश्यक कामासाठी ईपीएफच्या खात्यातून आपण पैसे काढू शकतो. नेमकं कोण-कोणत्या कामासाठी पीएफ खात्यातून पैसे काढू शकतो.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Provident Fund Money Withdrawal :

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निधी संघटनेने ही योजना तयार केलीय. या रिटारमेंट प्लानमध्ये कंपनी आणि कर्मचारी दोन्ही पीएफमध्ये समसमान योगदान देत असतात. तसेच जमा झालेल्या रक्कमेवर वार्षिक व्याज मिळत असते. कारण ही रक्कम निवृत्तीसाठी वापरली जात असून त्याला निवृत्ती घेतल्यानंतर ही रक्कम काढली जाते.परंतु जर निवृत्तीच्या आधी काही इमर्जन्सी आली तर आपल्याला पीएफचा पैसा काढता येतात. परंतु निवृत्तीआधी पैसे काढण्यासाठी काही नियम आहेत. काय नियम आहेत ते जाणून घेऊ.(Latest News)

कधी काढता येतात पैसे

कर्मचारी भविष्य निधी संघटना काही विशेष परिस्थितीत निवृत्तीच्या आधी पीएफ अकाऊंटमधून पैसे काढू शकतात. यात वैद्यकीय आणीबाणी, लग्न किंवा जमीन खरेदी करण्यासाठी पैसे काढू शकतो. जर एखाद्याची नोकरी गेली तर तो दोन महिन्यांनंतर पीएफची संपूर्ण रक्कम काढता येते. कुटुंबातील सदस्याच्या लग्नासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठीही पीएफमधून पैसे काढता येतात. परंतु यासाठी तुम्ही किमान सात वर्षे नोकरीवर काम करत असले पाहिजे. यानंतर तुम्ही तुमच्या योगदानाच्या ५० टक्के रक्कम काढू शकता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कितीवेळा पैसे काढू शकतो

तुम्ही निवृत्त होण्याआधी आपण पीएफच्या खात्यातून पैसे कितीवेळा काढू शकतो, असा प्रश्न अनेकांना पडला असेल त्याचही उत्तर येथे देण्यात आलंय. निवृत्त होण्याआधी आपण बहुतेकवेळा पैसे काढू शकतो. परंतु प्रत्येकवेळी तुम्हाला कारण सांगावे लागेल. लग्नासाठी तीन वेळेपेक्षा जास्तवेळी पैसे काढता येत नाही. दहावीनंतरच्या शिक्षणासाठीही पैसे काढता येतात. घर किंवा जमिनीसाठी फक्त एकदाच पीएफच्या खात्यातून पैसे काढता येतात.

काढलेल्या रक्कमेवर किती लागतो टॅक्स

तुम्ही जर ५ वर्षे सतत सेवेपूर्वी EPFकाढल्यास, १० टक्के दराने TDS कापला जातो. जर पीएफमधील रक्कम काढताना पॅनकार्ड दिलं नाही तर टीडीएस हा ३० टक्क्याने लागत असतो. जर कोणी कर्मचारी आपली ईपीएफची रक्कम नॅशनल पेन्शन स्कीमध्ये हस्तांतर म्हणजेच ट्रान्सफर करत असेल तर टॅक्स लागत नाही. EPF मधून ऑनलाइन पैसे काढण्यासाठी UAN सक्रिय आणि KYC केलेली पाहिजे. आधार, पॅन कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT