Petrol Diesel Rate Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate: वीकेंडला फिरायला जाण्याचा प्लान करताय? वाहनाची टाकी फुल करण्यापूर्वी जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव

Siddhi Hande

देशात पेट्रोल डिझेलचे रोज नवीन दर जाहीर होत असतात. जर तुम्ही वीकेंडला बाहेर जाण्याचा प्लान करत असाल तर आजचे इंधनाचे दर नक्की चेक करा. पेट्रोल डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून बदल झालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत आहे. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर.

देशात रोज पेट्रोल डिझेलचे दर जाहीर होतात ते कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. रोज सकाळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती बदलत असतात. WTI क्रूड ऑइल ७७.०३ डॉलर प्रति बॅरल आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल ८१.०३ डॉलर आहे.

देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोलचे दर ९४.७२ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलचे दर ८७.६२ रुपये प्रति लिटर आहे.मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे.कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे.चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.८५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.४३ रुपये आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल डिझेलचे दर

पुण्यात पेट्रोल १०४.१३ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.६५ रुपये आहे. ठाण्यात पेट्रोल १०३.६२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९०.१४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.नाशिकमध्ये पेट्रोल १०४.३५ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.८८ रुपये आहे.नागपूरमध्ये पेट्रोल १०४.२६ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.८१ रुपये आहे.कोल्हापूरमध्ये पेट्रोल १०४.८२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९१.३६ रुपयांनी विकले जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT