Petrol Diesel Rate  Saam tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Today : महाराष्ट्रात आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर

Petrol Diesel Rate 2nd July 2024: राज्यात पेट्रोल डिझेलचे रोज नवे दर जाहीर होत असतात. आज पेट्रोल डिझेलच्या भावात काहीही बदल झालेला नाही. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव स्थिर आहेत.

Siddhi Hande

रोज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर केल्या जातात. कच्च्या तेलाच्या किंमतीवर पेट्रोल- डिझेलचे भाव ठरवले जातात. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या भावातदेखील चढ-उतार होत आहेत.

महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलचे भाव कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पेट्रोल-डिझेलवरील वॅट दर कमी करुन पेट्रोल डिझेल जवळपास ६५ पैशांनी स्वस्त झाले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला होता. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबईत पेट्रोल १०३.४४ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये प्रति लिटर आहे. दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये आहे तर डिझेल ८७.६२ रुपयांना विकले जात आहे.कोलकत्ता येथे पेट्रोल १०४.९५ रुपयांना विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोल १००.९८ रुपयांना विकले जात आहे तर डिझेल ९२.५६ रुपयांना विकले जात आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुण्यात पेट्रोल १०४.६७ रुपयांना विकले जात आहे तर डिझेल ९१.१८ रुपयांना विकले जात आहे. ठाण्यात पेट्रोल १०३.६२ रुपयांना विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.१४ रुपये प्रति लिटर आहे. नाशिकमध्ये पेट्रोल १०४.४८ रुपयांना विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९१ रुपये प्रति लिटर आहे. नागपूरमध्ये पेट्रोल १०४.०३ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.५९ रुपये प्रति लिटर आहे.अहमदनगरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.७२ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.२४ रुपये आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT