Petrol Diesel Rate Today Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा तुमच्या शहरातील आजचा इंधनाचा भाव

Siddhi Hande

राज्यात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. पेट्रोल डिझेलच्या भावात गेल्या काही दिवसांपासून फारसा बदल झालेला नाही. यामुळे मात्र, वाहनधारकांच्या खिशाला फटका बसत आहे. पेट्रोल डिझेलचे नवे दर जाणून घेऊयात.

पेट्रोल डिझेलचे भाव हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड ऑइल ८०.१५ डॉलरवर विकले जात आहे. तर ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत ८२.३५ डॉलर आहे. चला तर मग जाणून घेऊयात तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे भाव

नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे. तर डिझेलची किंमत ८७.६२ रुपये आहे.मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये आहे. कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.३४ रुपये आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे भाव

पुण्यात पेट्रोल १०४.१४ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.६६ रुपये आहे.नाशिकमध्ये पेट्रोलची किंमत १०४.६८ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९१.७९ रुपये आहे.नागपूरमध्ये पेट्रोल १०३.९६ रुपयांवर विकले जात आहे तर डिझेल ९०.५२ रुपयांवर विकले जात आहे.ठाण्यात पेट्रोल १०३.८९ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९०.३९ रुपयांवर विकले जात आहे.कोल्हापूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.०१ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.५८ रुपये आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोलची किंमत १०३.८७ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९०.४२ रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

SCROLL FOR NEXT