Petrol Diesel Rate Today Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Rate Today: देशात पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील आजचा भाव काय? जाणून घ्या

Petrol Diesel Rate 18th July 2024: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलच्या भावात फारसा बदल झालेला नाही. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला चांगलाच फटका बसत असल्याचे दिसत आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव.

Siddhi Hande

राज्यात पेट्रोल डिझेलचे रोज नवे दर जाहीर होत असतात. सध्या राज्यात सर्वसामान्य लोक खाजगी वाहनांचा जास्तीत जास्त वापर करतात. त्यामुळे अनेकांना पेट्रोल डिझेलच्या वाढत्या भावाचा फटका बसतो. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून फारसा फरक झालेला नाही. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे भाव ६५ पैशांनी कमी केले होते. परंतु त्यानंतर कोणताही बदल झालेला नाही.

पेट्रोल डिझेलच्या भाव थेट परिणाम वाहनधारकांवर होते. त्याचसोबत सीएनजीचेही दर वाढवले आहेत. त्यामुळे रिक्षाचालक, सीएनजी कार असलेल्या लोकांच्या खिशाला फटका बसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात WTI क्रूड ऑइल ८२.२१ डॉलरवर विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड ऑइल ८५.०३ डॉलरवर विकले जात आहे.

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे भाव तपासा

मुंबईत पेट्रोलची किंमत १०३.४४ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ८९.९७ रुपये प्रति लिटर आहे. नवी दिल्लीत पेट्रोल ९४.७२ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ८७.६२ रुपये प्रति डॉलरवर विकले जात आहे. कोलकत्त्यात पेट्रोलची किंमत १०४.९५ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९१.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईत पेट्रोलची किंमत १००.८५ रुपये आहे तर डिझेलची किंमत ९२.४३ रुपये प्रति लिटर आहे.

महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर

पुण्यात पेट्रोल १०३.९८ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेलची किंमत ९०.५१ रुपये आहे.ठाण्यात पेट्रोलची किंमत १०३.६२ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.१४ रुपये आहे.नाशिकमध्ये पेट्रोल १०४.६९ रुपये प्रति लिटर विकले जात आहे तर डिझेल ९१.२० रुपये प्रति लिटर विकले जात आहे. नागपूरमध्ये पेट्रोलची किंमत १०४.०३ रुपये प्रति लिटर आहे तर डिझेलची किंमत ९०.५९ रुपये आहे.अहमदनगरमध्ये पेट्रोल १०४.३७ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे तर डिझेल ९०.८९ रुपये प्रति लिटरवर विकले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्यावर शिंदेसेनेचे आंदोलन

Ebola Virus: जीवघेण्या व्हायरसची भारतात एंट्री; लक्षणे दिसताच अहमदाबादमध्ये एकजण आयसोलेट

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

SCROLL FOR NEXT