FUEL PRICE HIKE IN INDIA  Saam Tv
बिझनेस

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Petrol Diesel Price Today: १ जून रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. एलपीजी सिलिंडर महागल्यानंतरही इंधन दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

Namdeo Kumbhar

Petrol Diesel Price Today 1 June: महिन्याच्या पहिल्या दिवशीच व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा भडका उडाला. तब्बल ४३ रूपयांनी १९ किलो वजनाचा गॅस महागला. गॅस सिलिंडरसोबतच आज सकाळी सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOCL यांनी पेट्रोल डीझेलचे दर अपडेट केले आहेत.

गॅस सिलिंडरच्या महागाईने होरपळलेल्या नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. कारण, सरकारी ऑइल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ केली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. पण पुढील काही दिवसांत इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आखाती देशात सुरू असलेल्या तणावामुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळेच किंमती आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात येत आहे. आजही ब्रेंट क्रूडच्या दरात वाढ झाली आहे. मार्केट उघडताच क्रूड ऑइल प्रति बॅरेल २.१६ रूपयांनी महागलेय. आज आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाची किंमत ९४ डॉलर प्रति बॅरेलपर्यंत पोहचली आहे. WTIमध्ये 2.35 डॉलर प्रति बॅरेल इतकी वाढ नोंदण्यात आली आहे. वाढत्या किंमतीमुळे पुन्हा एकदा दरवाढीचा शॉक बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जातोय.

मे महिन्यात पेट्रोल आणि डीझेलच्या दरात ₹7.50 ने वाढ झाली. त्यामुळे अनेक शहरात पेट्रोलचा दर ₹110 प्रति लिटरवर पोहोचला आहे. तसेच आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये डिझेलचा दर ₹100 प्रति लिटरच्या वर गेला आहे. मे महिन्यात पेट्रोलच्या दरात ४ वेळा वाढ झाली होती.

मुंबईमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर ₹१११.२१ इतका आहे, तर डिझेल ₹९७.८३ रूपये प्रति लीटर मिळणार आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ₹११३.५१ आणि डिझेलचा दर ₹९९.८२ आहे. चेन्नईमध्येही दरात कोणताही बदल झालेला नाही. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर ₹१०७.७७ आणि डिझेलचा दर ₹९९.५५ प्रति लिटर आहे. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ₹१०२.१२ आणि डिझेलचा दर ₹९५.२० प्रति लिटर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT