Petrol-Diesel Prices 6 September 2023 Crude oil prices increased Petrol diesel prices likely to increase  Saam TV
बिझनेस

Petrol-Diesel Prices: कच्च्या तेलाचे भाव कडाडले, पेट्रोल-डिझेल दरात भडका उडण्याची भीती; आजचा भाव काय?

Petrol-Diesel Prices 6 September 2023: इंधनाच्या किंमती कमी होणे दूरच आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर झपाट्याने वाढले आहेत.

Satish Daud

Petrol-Diesel Prices 6 September 2023

केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात करून सर्वसामान्यांना दिलासा दिला. आता गॅस सिलिंडर पाठोपाठ पेट्रोल-डिझेलच्या किंमतीतही कपात होईल, अशी अनेकांना आशा आहे. मात्र, इंधनाच्या किंमती कमी होणे दूरच आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाचे दर झपाट्याने वाढले आहेत. (Latest Marathi News)

सौदी अरेबिया आणि रशियाने कच्च्या तेलाचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 90 डॉलरच्या पुढे गेले आहेत. याचा परिणाम इंधनाच्या किंमतीवर होण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारी दिवसभरात देखील कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली.

कच्चा तेलाचे दर वाढताच बुधवारी सकाळी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधनाचे नवीन दर जारी केले आहेत. तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नवीन दरानुसार, आजही भारतात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) दरात कुठलीही वाढ झालेली नाही. मुंबईसह महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत.

पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकणार?

2022-23 या वर्षात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 75 ते 80 डॉलरच्या आसपास होत्या. मात्र, असं असताना देखील सरकारी ऑईल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात न करता नफा मिळवला. या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्यांना दिलासा दिला नाही. अशा परिस्थितीत आता कच्च्या तेलाने प्रतिबॅरल 90 डॉलरचा टप्पा ओलांडला असताना पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात होईल का? अशी शक्यता वर्तवली जात आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील इंधनाचे दर

दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर

मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.6 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajyog 2025: गजकेसरी आणि कलात्मक राजयोगामुळे फळफळणार 'या' राशींचं नशीब; उत्पन्नाचे नवे मार्ग होणार खुले

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

SCROLL FOR NEXT