Petrol-Diesel Price Saam Digital
बिझनेस

Petrol-Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या, पेट्रोल, डिझेलचे दर काय? जाणून घ्या

Petrol-Diesel Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रती बॅरल ८० डॉलरपर्यंत खाली आल्या आहेत. मात्र भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती पर बॅरल ८० डॉलरपर्यंत खाली आल्या आहेत. मात्र भारतीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या महानगरांंमधील दर जैसे थे आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेल चे दर कधी कमी होणार, असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

डब्ल्यूटीआय क्रूड आज सकाळी ७५.८९ डॉलर प्रती बॅरल होते. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ८० .६१ डॉलर आहे. दरम्यान भारतीय कंपन्यांनी नेहमीप्रमाणे आज पेट्रोल आणि डिझेलचे दर अपडेट केले मात्र त्यात कोणताही बदल दिसला नाही. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे तर बदलतात आणि नवीन दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर मूळ किमतीच्या दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. मात्र कच्च्या तेलाच्या किमतीत घट होऊनही दरात कोणताच बदल झालेला नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चार महानगरांमधील पेट्रोल डिझेलचे दर

मुंबई - पेट्रोल १०६.३१ , डिझेल ९४.२७

दिल्ली - पेट्रोल ९६.७२ , डिझेल ८९.६२

कोलकाता - पेट्रोल १०६.०३ , डिझेल ९२.७६

चेन्नई - पेट्रोल १०२.७४, डिझेल ९४.३३

मोठ्या राज्यांमधील पेट्रोल डिझेलचे दर

महाराष्ट्र - पेट्रोल १०६.९६, डिझेल ९३.४६

उत्तर प्रदेश -पेट्रोल ९६.३८, डिझेल ८९.५५

पश्चिम बंगाल -पेट्रोल १०६.९६, डिझेल ९३.४९

तामिळनाडू -पेट्रोल १०३.४५, डिझेल ९५.०८

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Reelstar Death: 'चिमणे, परत ये गं...'; रिलस्टार रोहिणीच्या आत्महत्येनंतर पतीची भावुक पोस्ट, पण नेटकरी संतापले, कारण?

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात जलशुल्क दरवाढीला सतेज पाटील यांचा विरोध

Accident News : शिर्डी-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, एसटी बस आणि कारची समोरासमोर धडक; दोघांचा जागीच मृत्यू

मोठी बातमी! संतोष देशमुखांच्या सख्ख्या भावावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Paneer Bhurji Recipe: नाश्त्याला चपातीसोबत खा पनीर भुर्जी, वाचा झटपट रेसिपी

SCROLL FOR NEXT