Petrol-Diesel Price Hike meta ai
बिझनेस

Petrol-Diesel Price Hike: CNG आणि LPG महागले! मग पेट्रोल-डीझेल स्वस्त की महाग? आजचे नवीन दर जारी, पाहा तुमच्या शहरातील भाव

Petrol Price Today : १ सप्टेंबरला पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल १११.२१ आणि डिझेल ९७.८३ रुपये आहे. मात्र CNG, PNG आणि कमर्शिअल LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली आहे.

Sakshi Sunil Jadhav

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ सप्टेंबर २०२६ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी सकाळी ६ वाजता आजचे दर जाहीर केले असून नागरिकांना जुन्याच दराने पेट्रोल - डिझेल मिळणार आहे.

देशातल्या प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल- डिझेलचे दर वेगवेगळे आहेत. मुंबईत पेट्रोल १११.२१ रुपये आणि डिझेल ९७.८३ प्रति लिटर आहे. दिल्लीत पेट्रोल १०२.१२ आणि डिझेल ९५.२० रुपये, तर कोलकात्यात पेट्रोल ११३.४७ रुपये आणि डिझेल ९९.५५ रुपये प्रति लिटर आहे. नोएडामध्ये पेट्रोल १०२.१२ आणि डिझेल ९५.५६, बंगळुरूमध्ये पेट्रोल ११०.९३ आणि डिझेल १०३.८२ रुपये आहे. जयपूरमध्ये पेट्रोल ११२.६९ आणि डिझेल ९७.७८ प्रति लिटर आहे.

LPG सिलेंडर महागला

दरम्यान, १ सप्टेंबरपासून कमर्शियल LPG सिलेंडरच्या दरात ९.५० ची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिक ग्राहकांना आता सिलेंडरसाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. मात्र पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ न झाल्यान वाहनचालकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

मुंबईत CNG-PNG दरवाढ

मुंबई आणि उपनगरांमध्ये मात्र CNG आणि PNG ग्राहकांना जास्त भार सहन करावा लागणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) CNG च्या दरात २ रुपये प्रति किलो, तर PNG च्या दरात १ रुपयांनी प्रति युनिट वाढ केली आहे. ही दरवाढ ३१ ऑगस्ट २०२६ च्या मध्यरात्रीपासून लागू झाली असून मुंबईत CNG चा दर आता ८८ रुपये प्रति किलो झाला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपया - डॉलरच्या दरासह विविध घटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे दररोजचे ताजे दर तपासूनच इंधन भरल्याने खर्चाचे नियोजन करणे सोपे होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

भाजपच्या तीन नेत्यांची पक्षातून हकालपट्टी; काय आहे कारण? BJPच्या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT