Petrol Diesel Price Today (24 August) Saam tv
बिझनेस

Petrol Diesel Price Today (24 August): कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण; 'या' शहरांमध्ये पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त

Petrol Diesel Price Today 24th August 2023: WTI ०.२८ टक्क्यांनी घसरले असून ७८.६७ प्रति बॅरल डॉलरने विकले जात आहे.

Ruchika Jadhav

Petrol Diesel Price in Mumbai (Marathi):

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये आज घसरण झाली आहे. दररोज सकाळी ६ वाजता सरकारी तेल कंपन्या कच्च्या तेलाच्या किंमती जाहीर करतात. त्यानुसार आज कच्च्या तेलाच्या किंमतींसह पेट्रोल-डिझेलच्या किंमती देखील काही शहरांमध्ये घसरल्या आहेत. ब्रेंड क्रूड ऑइल आणि डब्लूटीआय क्रूड ऑइल दोन्हींमध्ये घसरण झालेली दिसत आहे. WTI ०.२८ टक्क्यांनी घसरले असून ७८.६७ प्रति बॅरल डॉलरने विकले जात आहे. ब्रेंड क्रूड ऑइल ०.२२ टक्क्यांनी घसरलं असून ८३.०३ प्रति बॅरल डॉलरने विकलं जातंय. (Latest Marathi News)

आग्रामध्ये पेट्रोल ४५ पैशांनी स्वस्त झालं आहे. पेट्रोल ९८.१८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ४४ पैशांनी स्वस्त होऊन ८९.३६ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय. अहमदाबादमध्ये पेट्रोलचे-डिझेलचे दर ३५ पैशांनी महागले आहेत. पेट्रोल ९६.७७ आणि डिझेल ९२.५२ प्रति लिटरवर पोहचलं आहे. अजमेरमध्ये देखील पेट्रोल-डिझेल ३० ते ३४ पैशांनी महागलं आहे. डिझेल ९४.०८ आणि पेट्रोल १०८.८८ रुपये प्रति लिटर आहे.

नोएडात पेट्रोल १७ पैशांनी स्वस्त झालं असून ९६.७६ रुपये प्रति लिटर आणि डिझेल देखील १७ पैशांनी स्वस्त होऊन ८९.९३ रुपये प्रति लिटरने विकलं जात आहे. गुरुग्रामध्ये पेट्रोल ३३ पैशांनी स्वस्त झालंय. ९६.६६ रुपये प्रति लिटर. तर डिझेल ३२ पैशांनी स्वस्त होऊन ८९.५४ रुपये प्रति लिटर विकलं जातंय. लखनऊमध्ये पेट्रोल आणि डिझेल १७ पैशांनी स्वस्त झालंय. इथे पेट्रोल ९६.५७ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ८९.७६ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.

1. चार महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

नवी दिल्ली - पेट्रोल ९६.७२रु., डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

चेन्नई- पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

कोलकाता- पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

2. शहरानुसार पेट्रोल-डिझेलच्या किंमती कशा तपासायच्या?

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज तेल कंपन्या ठरवतात. शहरे आणि राज्यानुसार या किमती निश्चित केल्या जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या शहराची नवीनतम किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही एसएमएसद्वारेच तपासू शकता. जर तुम्ही इंडियन ऑइलचे ग्राहक असाल तर इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी RSP<deलर कोड> लिहा आणि ९२२४९९२२४९ वर मेसेज पाठवा. तर, BPCL ग्राहकांना डीलर कोड> 9223112222 नंबरवर पाठवावा लागेल आणि HPCL ग्राहकांना HPPRICE <डीलर कोड> 9222201122 क्रमांकावर पाठवावा लागेल. यानंतर, काही मिनिटांत कंपनी तुम्हाला शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर पाठवेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI कस्टमर्स सावध व्हा, फेक मेसेज फिरतोय, चुकूनही हे काम करू नका

'भारताला तर पाकिस्तानही हरवेल...' टीम इंडियावर Wasim Akram ची जहरी टीका

Chandra Gochar 2024: 'या' ३ राशींचा गोल्डन टाईम संपला; चंद्राच्या गोचरमुळे अडचणीत होणार वाढ

Homemade Snacks Quick Recipe: पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आलाय? मग नाश्त्याला 'या' युनिक रेसिपी नक्की ट्राय करा

UP Madrasa Act : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; UP मदरसा अ‍ॅक्टला मान्यता, 17 लाख विद्यार्थ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT