Petrol Diesel Price Today Latest: पेट्रोल-डिझेलच्या किंमती कच्चा तेलाच्या दरावर आधारभूत असतात. गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत चढ-उतार होत आहे. बुधवारी देखील कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट झाली. कच्च्या तेलाचे दर घसरताच भारतीय तेल कंपन्यांनी गुरूवारी पहाटे इंधनाचे नवे दर जारी केले आहेत. (Latest Marathi News)
तेल कंपन्यांनी जारी केलेल्या दरानुसार, आजही भारतीय तेल बाजारात पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कुठलाही बदल झालेला नाही. देशासह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये इंधनाचे दर स्थिर आहेत. 6 एप्रिल 2022 रोजी तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात शेवटची वाढ केली होती.
तेव्हापासून पेट्रोल-डिझेलच्या (Petrol Diesel) दरात कुठलीही वाढ अथवा घट झालेली नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता जारी केले जातात. केंद्र सरकारने घरगुती गँस सिलिंडरच्या किंमतीत तब्बल 200 रुपयांनी कपात केली. त्यामुळे महागाईत होरपळून निघालेल्या जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळाला.
गँस सिलिंडर पाठोपाठ आता पेट्रोल डिझेलच्याही किंमती कमी करा, अशी मागणी सर्वसामान्यांकडून केली जात आहे. सध्या पेट्रोल-डिझेलवर एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि मोठ्या प्रमाणात व्हॅट आकारला जात आहे. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पटीवर पोहचली आहे.
मुंबईमध्ये आज पेट्रोल १०६.३१ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२१ रुपये प्रति लिटर आहे.
चेन्नईत पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रत्येकी १३ ते १४ पैशांनी घट झालीये. त्यामुळे पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.
दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरने विकलं जातंय.
कोलकत्तामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे.
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेण्यासाठी HPCL ग्राहकांनी HPPRICE <डीलर कोड> 9222201122 वर पाठवावा. याशिवाय इंडियन ऑइलच्या ग्राहकांनी RSP <डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर मॅसेज पाठवा. BPCL च्या ग्राहकांसाठी पेट्रोल-डिझेलच्या किंमत जाणून घेण्यासाठी, <डीलर कोड> 9223112222 वर पाठवता येईल. हे कोट पाठवल्यावर काही मिनिटांतच तुम्हाला कच्च्या तेलाच्या किंमती किती आहेत हे समजेल.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.