तुम्ही जर खेड्यापाड्याजवळ राहत असाल आणि तुम्हाला शेळीपालन, दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालन सुरू करण्याचा विचार करत आहात? तर तुमच्यासाठी बातमी आहे. मु्ख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना २०२६ अंतर्गत अर्जाची प्रोसेस २६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या योजनेच्या माध्यमातून पशुपालन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना सरकारी अनुदानाची संधी मिळू शकते. त्यामुळे अर्ज सुरू होण्याआधीच आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणं गरजेचं आहे. एखादं महत्त्वाचं कागदपत्र नसेल तर अर्ज करताना अडचणी येऊ शकतात.
तर या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करताना काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती जवळ असणं महत्त्वाचं आहे. त्यामध्ये पुढच्या गोष्टींचा समावेश होतो.
Maha ID
Farmer ID
बँक पासबुक
आधारशी लिंक असलेला मोबाइल क्रमांक
बँक खाते क्रमांक आणि IFSC कोड
दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र सादर करावं लागू शकतं. तसेच बचत गटातून अर्ज करणाऱ्यांना संबंधित गटाची महत्त्वाची कागदपत्रे तयार ठेवावी लागतील.
ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना Maha ID महत्त्वाची आहे. त्यामुळे तुमची Maha ID नसेल तर अर्ज सुरू होण्याआधी नोंदणी करून घ्या. त्याचसोबत Farmer ID उपलब्ध आहे की नाही, हेही तपासून घ्या. आधार कार्डशी जोडलेला क्रमांक लिंक असणं महत्त्वाचं आहे. कारण अर्ज करताना मोबाइलवर OTP येऊ शकतो. त्यामुळे आधारशी जोडलेला मोबाइल क्रमांक सुरू ठेवा.
योजनेचा लाभ थेट बँक खात्यात मिळण्याची प्रोसेस असल्याने बँक खात्याची माहिती अचूक असणं गरजेचं आहे. खातं क्रमांक, IFSC कोड, आधार लिंकिंग आणि DBT सुविधा तपासून घ्या. चुकीची माहिती भरल्याने अनुदान मिळण्याच्या प्रोसेसपर्यंत अडचणी येऊ शकतात.
अर्ज भरताना कोणत्या पशुपालन व्यवसायासाठी अर्ज करायचा आहे, त्या घटकाची पात्रता काय आहे आणि कोणती कागदपत्रे गरजेची आहेत, याची माहिती आधी घ्या. अर्जात चुकीची माहिती भरू नका. तसेच सर्व कागदपत्रांवरची माहिती अचूक भरा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.