Pan Card  Saam Tv
बिझनेस

PAN 2.0: पॅन कार्ड 2.0 म्हणजे नक्की काय? अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिक

New PAN Card 2.0: केंद्र सरकारने नवीन पॅन कार्ड 2.0 प्रोजेक्टची घोषणा केली आहे. पॅन कार्ड २.० नक्की आहे तरी काय? जाणून घ्या.

Siddhi Hande

सोमवारी केंद्र सरकारने पॅन कार्डसंबंधित महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने पॅन २.० प्रोजेक्टची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या प्रोजेक्टला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रिय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या म्हणण्यांनुसार, भारत सरकार यासाठी १४३५ कोटी रुपये खर्च करणार आहे.

आता पॅन २.० या प्रोजेक्टमुळे अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाल्या आहेत. पॅन २.० मुळे आता असलेल्या पॅन कार्डचं काय होणार याबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच तुम्हाला परत पॅन कार्ड काढावे लागणार का? असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत.

पॅन कार्ड 2.0 म्हणजे काय?

पॅन कार्ड २.० हे सध्याच्या पॅन कार्डचे अपग्रेडेट व्हर्जन असणार आहे. या पॅन कार्डमध्ये क्यू आर कोड दिलेला असेल. त्यामुळे तुमची सर्व माहिती एकाच क्लिकवर मिळणार आहे. तसेच नवीन पॅन कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागणार नाही. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने हे काम करु शकतात.

पॅन कार्ड 2.0 चे उद्दिष्ट

पॅन कार्ड 2.0 चे मुख्य उद्दिष्ट सर्व करदात्यांची नोंदणी आणि सेवा सुलभ आणि जलद गतीने करणे हे आहे. तसेच करदात्यांची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. हे संपूर्ण काम इको फ्रेंडली होणार आहे. कमी खर्चात आणि ऑनलाइन पद्धतीने तुम्ही नवीन पॅन कार्ड बनवू शकतात. यामुळे डिजिटल सुविधा अपग्रेडे करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT