Pan-Aadhaar Link Saam Tv
बिझनेस

Pan-Aadhaar Link ची मोठी अपडेट! घर खरेदी करणे होणार कठीण? मोजावे लागतील अधिक पैसे

Pan Aadhaar Link For Property : जर तुम्ही आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर भविष्यात तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. तुम्हालाही घर खरेदी करायचे असेल तर नवीन आयकर नियमांनुसार तुम्हाला मोठा प्रमाणात कर भरावा लागेल.

कोमल दामुद्रे

Pan Aadhaar Link Update :

आधार कार्ड आणि प‌ॅन कार्ड हे आपल्या महत्त्वाच्या कागदपत्रातील एक आहे. जून महिन्यात पॅनला आधार कार्डशी लिंक करण्याची तारीख वाढवण्यात आली होती.

परंतु, जर तुम्ही आधार कार्डला पॅन कार्डशी लिंक केले नसेल तर भविष्यात तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागू शकतो. तुम्हालाही घर खरेदी करायचे असेल तर नवीन आयकर नियमांनुसार तुम्हाला मोठा प्रमाणात कर भरावा लागेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मालमत्ता खरेदी करायला गेल्यास कर हा भरावा लागतो. ते टीडीएसच्या स्वरुपात कर आकारला जातो. पण जर अद्याप पॅन-आधार लिंक (Aadhar Link) केले नसेल तर घर (Home) खरेदी करणे कठीण होऊ शकते.

1. पॅन-आधार लिंक नसेल तर...

जर तुमचे पॅन- आधारशी लिंक नसेल तर तुम्हाला अधिकचा TDS भरावा लागणार आहे. तुम्ही ५० लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची (Price) मालमत्ता खरेदी केल्यास त्यावर १ टक्का टीडीएस भरावा लागेल. यामध्ये खरेदीदाराला केंद्र सरकारला १ टक्के आणि विक्रेत्याला ९९ टक्के TDS भरावा लागतो. पण पॅन- आधार लिंक नसेल तर खरेदीदाराला १ टक्के TDS ऐवजी २० टक्के TDS भरावा लागणार आहे. पॅन- आधार लिंक करण्याची अंतिम मुदत संपली असून आयकर विभागाने नोटीस पाठवण्यास सुरुवात केली आहे.

2. कारण काय?

आयकर कायद्याच्या कलम 139 AA च्या तरतुदीनुसार, प्राप्तीकर विवरणपत्रात आधार लिंक करणे अनिवार्य आहे. परंतु, अशी अनेक प्रकरणे देखील समोर आहेत जिथे पॅन-आधार लिंक नाही. अशातच अनेक घर खरेदी करणाऱ्यांना आयकर नोटीसा बजावल्या आहेत. आयकर विभागाने अशा अनेक घर खरेदीदारांना 20% टीडीएसच्या नोटिसा पाठवल्या आहेत. पॅन लिंक नसल्यामुळे, त्यांच्याकडून 20% TDS भरण्याची नोटीस प्राप्त झाली आहे. जोपर्यंत पॅन लिंक होत नाही, तोपर्यंत 20% TDS भरावा लागेल.

3. पॅन-आधार लिंक कसे कराल?

  • पॅन-आधार लिंक करण्यासाठी, आयकराच्या ई-फायलिंग वेबसाइटवर जा.

  • साइट पेजच्या डाव्या बाजूला तुम्हाला क्विक लिंक्सचा पर्याय मिळेल. त्या ठिकाणी तुम्हाला 'Link Aadhaar' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

  • तुमचा पॅन, आधार क्रमांक आणि नाव टाकावे लागेल. ही माहिती दिल्यानंतर तुम्हाला ओटीपी पाठवला जाईल.

  • ओटीपी टाकल्यानंतर तुमचा आधार आणि पॅन लिंक होईल.

  • तुमची आधार आणि पॅन माहिती वैध आहे की नाही हे पाहण्यासाठी आयकर विभाग तुमचे तपशीलही चेक करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

रेल्वेचे खुनी कर्मचारी,आठ प्रवाशांचे हत्यारे मोकाट, माजुरड्या कर्मचा-यांवर कारवाई कधी?

SCROLL FOR NEXT