PAN Card Saam Tv
बिझनेस

PAN 2.0: आता डिजिटल होणार PAN 2.0; जुन्या पॅन कार्डचं काय होणार? जाणून घ्या

PAN 2.0 News: पॅन कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे. पॅन कार्ड २.० मुळे आता तुमची माहिती डिजिटल पद्धतीने स्टोअर होणार आहे. त्यामुळे तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड कुठेच घेऊन जाण्याची गरज नाही.

Siddhi Hande

पॅन कार्ड हे प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचे कागदपत्र आहे.पॅन कार्डची गरज अनेक ठिकाणी असते.पॅन कार्डमुळे आयकर भरणे सोपे जाते.बँकेच्या कामासाठी आणि आयकर रिटर्न भरण्यासाठी पॅन कार्ड वापरले जाते. पॅन कार्डबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. (PAN 2.0)

केंद्र सरकारने PAN 2.0 प्रोजेक्ट लाँच केला आहे. यामध्ये आता तुमचे पॅन कार्ड पुर्णपणे डिजिटल होणार आहे. या पॅन कार्डमध्ये तुम्हाला क्यू आर कोडमध्ये सर्व माहिती मिळणार आहे. आता पॅन कार्ड २.० आल्यामुळे तुम्हाला पॅन कार्डची प्रत तुमच्याजवळ ठेवावी लागणार का? असे अनेक प्रश्न नागरिकांना पडले आहेत. तर आता आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देणार आहोत.(PAN 2.0 News)

पॅन कार्ड २.० मध्ये क्यूआर कोड दिला आहे. या क्यूआर कोडमध्ये तुमची सर्व माहिती दिली जाणार आहे. पॅन कार्डवरील क्यूआर कोडला स्कॅन केल्यावर तुमची सर्व माहिती मिळणार आहे. हे पॅन कार्ड लवकरच नागरिकांना दिले जाणार आहे.

या डिजिटल पॅन कार्डमुळे जुन्या पॅन कार्डचं काय होणार?

पॅन कार्ड २.० मुळे आता तुम्हाला फिजिकल पॅन कार्ड स्वतः जवळ ठेवण्याची गरज भासणार नाही. तुमचे सर्व काम डिजिटली होणार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतेही काम करण्यासाठी जाताना फिजिकल पॅन कार्ड घेऊन जाण्याची गरज नाही.

देशात लवकरच फिजिकल पॅन कार्डऐवजी पॅन कार्ड २.० दिले जाणार आहे. भारत सरकार तुमच्या ई-मेल आयडीवर हे डिजिटल पॅन कार्ड पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. या पॅन कार्ज २.० मुळे अर्ज करायची गरज भासणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

Shiv Sena UBT : ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्यावर कारवाई, उपनेता वर्षभरासाठी थेट येरवडा जेलमध्ये, राज्यात मोठी खळबळ

Heart Health : छातीत दुखण्याव्यतिरिक्त शरीरात 'ही' ६ लक्षणे दिसल्यास सावधान!

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

SCROLL FOR NEXT