Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: इंग्रजी येत नाही म्हणून चिडवलं; हिम्मत नाही सोडली, UPSC केली क्रॅक; IAS सुरभि गौतम यांची यशोगाथा

Success Story Of IAS Surbhi Gautam: आयएएस सुरभि गौतम यांनी परिस्थितीशी दोन हात करुन यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी इंग्रजी येत नव्हतं म्हणून अनेकांनी चिडवलं होतं. परंतु त्यांनी हार मानली नाही.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि कामात सातत्य ठेवणे खूप गरजेचे आहे. परिस्थिती कशीही असली तरीही त्यावर मात करायची असते. असचं काहीसं सुरभि गौतम यांच्यासोबत झालं. सुरभि गौतम यांनी खूप मेहनत करुन यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. (Success Story)

सुरभि गौतम यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी आपले गाव सोडले आणि शहरात आहे. सुरभि या मूळच्या मध्य प्रदेशाच्या रहिवासी. त्यांचे वडील वकील आहेत. त्यांची आई शिक्षिका आहे. सुरभि गौतम यांचे शिक्षण सरकारी शाळेत झाले. शाळेत अनेक सुविधांची कमी होती. तरीही सुरभि यांनी हार मानली नाही त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले.

सुरभि गौतम या सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार होत्या. त्यांनी दहावी, बारावीत स्टेट टॉपर लिस्टमध्ये आपले नाव मिळवलं.त्यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण गावात केले. यानंतर त्यांनी इंजिनियरिंगची परीक्षा दिली. यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी शहरात येण्याचा निर्णय घेतला. सुरभि यांनी भोपाळ येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये इंजिनियरिंग केले होते.

सुरभि यांचे शिक्षण सरकारी शाळेत झाले असल्याने त्यांनी इंग्रजी बोलण्यात खूप अडचणी आल्या. यामुळे अनेकांची त्यांची मज्जा घेतला. त्यांना चिडवलं. परंतु त्यांनी हार मानली नाही. त्यांनी इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रोज १० नवीन शब्द शिकण्याचे ठरवले. यामुळे त्यांनी सहामाही परीक्षेत टॉप केले. त्यांनी विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवून गोल्ड मेडल मिळवले.

सुरभि यांनी इंजिनियरिंगनंतर BARC मध्ये काम केले. याचसोबत त्यांनी स्पर्धा परीक्षेती तयारी केली. २०२३ साली त्यांनी आईईएश परीक्षेत टॉप केले.यानंतर पुन्हा २०१६ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. यावेळी त्यांनी ५० रँक मिळाली. यानंतर त्या आयएएस अधिकारी झाल्या. तुमच्याकडे जर शिकण्याची इच्छा असेल तर तुम्ही काहीही करु शकतात हे सुरभि यांनी दाखवून दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

EPFO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! PF काढण्याच्या नियमात करणार बदल; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT