new smartphone  Saam tv
बिझनेस

8000mAh बॅटरी, कॅमेरा, फीचर्स आणि डिजाइनही जबराट; बाजारात हटके मोबाईल लाँच होणार?

new smartphone : बाजारात लवकरच हटके मोबाईल लाँच होण्याची शक्यता आहे. 8000mAh बॅटरी, कॅमेरा, फीचर्स या मोबाईलमध्ये असणार आहे.

Vishal Gangurde

वनप्लस 15R लवकरच चीन आणि जागतिक बाजारात लाँच होणार

8000mAh बॅटरी, 16GB RAM, Snapdragon 8 Gen 5 आणि 165fps हाय फ्रेम रेट

100W फास्ट चार्जिंग आणि फ्लॅट फ्रेम, पिल-शेप्ड रियर मॉड्यूलसह प्रीमियम डिझाइनसह मिळणार

वनप्लस कंपनी लवकरच हटके फोन लाँच करण्याची शक्यता आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी वनप्लस 15 लाँच केला. त्यानंतर कंपनी लवकरच वनप्लस 15R लाँच करण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात वनप्लस 15R या नावाने हा फोन लाँच होणार आहे. तर चीनच्या बाजारात वनप्लस Ace 6T नावाने लाँच करण्यात येणार आहे.

लाँच करण्याआधी या स्मार्टफोनची डिझाइन आणि फिचर्स लीक झाले आहेत. त्याचबरोबर फोनचे महत्वाचे फिचर्स देखील लीक झाले आहेत. वनप्लस Ace 6T मध्ये कंपनी वनप्लस 15 डिझाइन लँग्वेज फॉलो करणार आहे.

वनप्लस Ace 6T च्या डिझाइनला टिस्प्स्टर Evan Blass ने टीज केला आहे. स्मार्टफोन फ्लॅट फ्रेममध्ये डिझाइन करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन काही प्रमाणात वनप्लस 15 सारखा असणार आहे. यात रियर पॅनलवर पिल-शेप्ड मॉड्यूल मिळणार आहे. तसेच रियर कॅमेरा आणि LED फ्लॅश देखील मिळणार आहे. फ्रंटमध्ये पंच कटआऊट देण्यात आला आहे. डिव्हाइसमध्ये प्लस बटन देण्यात आलं आहे. वॉल्यूम रॉकर आणि पॉवर बटन उजव्या बाजूला देण्यात आलं आहे.

वनप्लस Ace 6T अनेक महत्वाची माहिती समोर आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 16GB RAM देण्यात आलं आहे. तसेच Qualcomm Snapdragon 8 Gen 5 प्रोसेसर देण्यात आलं आहे. त्याचबरोबर Adreno 840 GPU देखील देण्यात आलं आहे. या फोनला 165fps चं हाय फ्रेम रेट मिळणार आहे.

वनप्लसच्या स्मार्टफोनमधील आतापर्यंत सर्वात मोठी बॅटरी असणार आहे. या फोनला 8000mAh बॅटरी देण्याची शक्यता आहे. फोनमध्ये 100w चार्जिंगचा सपोर्ट मिळेल. तर 6.7 inch चं 1.5K रिझोल्यूशन असणारा OLED डिस्प्ले पाहायला मिळण्याची शक्यता आहे. रियर साइडला 50MP मेन लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स देखील मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Travel : किल्ल्यांचे विहंगम दृश्य अन् आव्हानात्मक ट्रेक, नाशिकमध्ये लपलंय 'हे' सुंदर ऐतिहासिक ठिकाण

Maharashtra Live News Update: अशोक चव्हाण यांच्या समर्थकांकडून आचारसंहितेचा भंग

Municipal Elections : निवडणुका लागताच महायुतीत मिठाचा खडा, अजित पवार स्वबळावर लढणार, ठाण्यात रंगत वाढली

Bigg Boss Marathi 6 : अंकिता वालावलकरच्या नवऱ्याचं 'बिग बॉस मराठी'शी खास नातं, कोकण हार्टेड गर्लनं VIDEO शेअर करत केला खुलासा

Accident: आनंदावर विरजन! लग्नाला जाताना समृद्धी महामार्गावर कार उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू,अपघातापूर्वीचा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT