Success Story saam tv
बिझनेस

Success Story: कधी-काळी एका खोलीत राहून काढले दिवस, आज आहेत शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, पाहा काय आहे त्यांचा बिझनेस?

Success Story: अश्विन यांच्या आयुष्यात एक काळ असा होता ज्यावेळी ते अपार्टमेंटमध्ये एका खोलीत राहत होते. मात्र आज त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांची एकूण संपत्ती 10046 कोटी रुपये आहे.

Surabhi Jagdish

म्हणतात ना अंगी जिद्द आणि चिकाटी असेल तर व्यक्ती कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो. अशीच काहीशी यशोगाथा आहे सूरतच्या अश्विन देसाई यांची. अश्विन यांच्या आयुष्यात एक काळ असा होता ज्यावेळी ते अपार्टमेंटमध्ये एका खोलीत राहत होते. मात्र आज त्यांच्या मेहनतीच्या जोरावर त्यांची एकूण संपत्ती 10046 कोटी रुपये आहे. ते एथर इंडस्ट्रीजचे संस्थापक आहेत. 2013 मध्ये त्यांनी या कंपनीची पायाभरणी केली आणि कंपनीच्या लिस्टिंगमुळे अश्विन देसाई अब्जाधीश झाले.

२०१३ मध्ये सुरु केली कंपनी

अश्विन देसाई यांनी 2013 मध्ये एथर इंडस्ट्रीज या त्यांच्या कंपनीची स्थापना केली होती. आज ही कंपनी ॲग्रोकेमिकल्स, फार्मास्युटिकल्स त्याचप्रमाणे तेल आणि वायू यांसारख्या उद्योगांना विशेष रसायनांचा पुरवठा करणारी प्रमुख कंपनी बनलीये. अथरचे गुजरातमध्ये दोन कारखाने असून देसाई यांची मुलं रोहन आणि अमन व्यवसाय संचालन आणि तांत्रिक बाबी हाताळतात. याशिवाय त्यांची पत्नी पोर्णिमा या बोर्डाच्या सदस्या आहेत.

जून 2022 मध्ये देसाई यांनी त्यांची कंपनी पब्लिक केली आणि $103 कोटी जमा केले. कंपनीचे शेअर्स 10% प्रीमियमसह शेअर बाजारात लिस्ट झाली आणि यामुळे देसाई अब्जाधीश बनले.

प्रवासाला कशा प्रकारे झाली सुरुवात?

अश्विन देसाई यांचा हा प्रवास 1976 मध्ये सुरू झाला. त्यानंतर त्यांनी आपल्या एका नातेवाईकासोबत खास केमिकल्सचा व्यवसाय सुरू केला. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार, देसाई आपल्या आईसोबत सुरतला गेले होते. तिथे त्यांची भेट या नातेवाईकाशी झाली. यानंतर देसाई यांनी आपल्या व्यवसायाला शून्यापासून सुरुवात केली.

एका खोलीत राहून काढले दिवस

सुरतमध्ये एका खोलीच्या अपार्टमेंटमध्ये राहत असताना, देसाई यांनी शहराच्या जवळपास विहिरीसह एक लहान शेत भाड्याने घेतलं होतं. या ठिकाणी त्यांनी सल्फरिल क्लोराईडचे उत्पादन सुरू केलं. हे एक अतिशय धोकादायक अकार्बनिक कंपाऊंड आहे. त्यावेळी भारतात आयात होत होती.

बिझनेसचा होतो विस्तार

अश्विन देसाई यांचा एथर इंडस्ट्रीजचा अजूनही विस्तारत होतोय. कंपनीने सुरतमध्ये आणखी एका कारखान्यासाठी नवीन जागा घेतली असून ते सुरतचे सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. सुरतचे दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती फारुख जी पटेल आहेत. त्यांची एकूण संपत्ती 9,700 कोटी रुपये आहे. पटेल हे केपी ग्रुपचे मालक आहेत. एनजे इंडिया इन्व्हेस्टमेंटचे नीरज चोक्षी हे सुरतच्या अब्जाधीशांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असून ते 9,600 कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

SCROLL FOR NEXT