बिझनेस

NPCI कडून इनकम टॅक्स पोर्टलवर नवी सुविधा लॉन्च; पॅन, बँक खात्याचं व्हेरिफिकेशन होईल एका झटक्यात

एनपीसीआयकडून सर्व बँकांना सांगण्यात आलंय की, इनकम टॅक्स ई-फायलिंग पोर्टलसाठी रियल टाइम पॅन आणि अकाउंट व्हिरेफिकेशनसाठी एपीआय वापर सुलभ केलाय.

Bharat Jadhav

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आयकर ई-फायलिंग वेबसाइटवर पॅन आणि बँक खात्याची पडताळणी सुलभ करण्यासाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. करदात्यांना आणि सरकारी विभागांना प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया जलद आणि सोपी बनवण्याचे उद्दिष्ट आहे.

एनपीसीआयने एक परिपत्रक जारी करून या अॅप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (एपीआय) बद्दल माहिती दिली. यामुळे पॅन तपशील, बँक खाते स्थिती आणि खातेधारकांच्या रिअल टाइम पडताळणीसाठी डिझाइन केलंय. या इंटरफेसच्या मदतीने, बँकांच्या कोअर बँकिंग सिस्टम (CBS) मधून थेट डेटा पडताळणी केली जाईल.

परिपत्रकात म्हटले आहे की, हे इंटरफेस विशेषतः सरकारी विभागांसाठी डिझाइन केले आहे, ज्याच्या मदतीने ते त्यांच्या बँकांच्या कोअर बँकिंग सिस्टम (CBS) मधून त्यांच्या ग्राहकांचे पॅन, खाते स्थिती आणि खातेधारकाचे नाव व्हिरिफेकेशन शकतील. API हे सॉफ्टवेअर ब्रिज म्हणून काम करेल. API हा एक सॉफ्टवेअर ब्रिज आहे, जे दोन सिस्टमना संवाद साधण्यास आणि डेटा शेअर करण्यास परवानगी देते.

या इंटरफेसच्या मदतीने, आयकर पोर्टल सारखे सरकारी प्लॅटफॉर्म बँकांच्या मुख्य प्रणालींमधून सुरक्षित आणि जलद पडताळणी करू शकतील. ही सेवा भारत सरकारला पुरविली जात असल्याने, एनपीसीआयने सर्व सदस्य बँकांना प्राधान्याने ही सुविधा लागू करण्याचे आवाहन केले आहे.

यामुळे करदात्यांसाठी कर विवरणपत्र भरताना पॅन-बँक खाते जोडण्याची प्रक्रिया वेगवान होईल, पडताळणी दरम्यान मॅन्युअल चुका कमी होतील. विवरणपत्रे आणि इतर कर संबंधित देयकांची प्रक्रिया वेगवान होईल. तसेच, करदात्याच्या डेटा पडताळणीची प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होईल. सहसा, कर रिटर्न दाखल केल्यानंतर, ई-फायलिंग खात्यात १०-१२ कामकाजाच्या दिवसांत वैधता स्थिती अपडेट केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT