Rolls-Royce Boat Tail Saam Tv
बिझनेस

Most Expensive Car: अंबानी, टाटा आणि अदानी नाही, तर जगातील या प्रसिद्ध लोकांकडे आहे 'ही' 234 कोटींची कार; फीचर्स जाणून थक्क व्हाल

Satish Kengar

प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी, रतन टाटा आणि गौतम अदानी यांच्या गॅरेजमध्ये अनेक आलिशान आणि महागड्या गाड्या आहेत. मात्र एक अशी कार आहे, जी या तीन मोठ्या उद्योगपतींकडे अजूनही नाही. या हाय क्लास कारची किंमत जवळपास 234 कोटी रुपये आहे. आम्ही रोल्स रॉयस बोट टेलबद्दल बोलत आहोत.

रॅपर जे-झेड, त्याची पत्नी आणि पॉप आयकॉन Beyonce यांच्याकडे आहे रोल्स-रॉयस बोट टेल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही जबरदस्त कार रॅपर जे-झेड, त्याची पत्नी आणि पॉप आयकॉन Beyonce यांच्या मालकीची आहे. याशिवाय अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू मौरो इकार्डीच्या कारच्या ताफ्यात या कारचा समावेश आहे. यानंतर जगातील सर्वात मोठ्या हिरे व्यापाऱ्याकडेही ही कार आहे, ज्यांच्या नावाचा कंपनीने खुलासा केलेला नाही.

रोल्स रॉयस बोट टेलमध्ये एकूण 1813 पार्टस

Rolls-Royce Boat Tail ही 4 सीटर लक्झरी कार आहे, जी खरेदीदाराच्या गरजा आणि मागणीनुसार त्याच्या आवडत्या फीचर्ससह डिझाइन केलेली आहे. ब्रिटीश कार निर्मात्या रोल्स रॉइसने चार वर्षांत हे मॉडेल तयार केले होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यात एकूण 1813 पार्टस आहेत.

इंजिन

Rolls-Royce Boat Tail 4 मध्ये 6075 लिटरचे सुपर पॉवरफुल इंजिन आहे. यात उच्च दर्जाचे इंटीरियर आहे. रोल्स रॉयस बोट टेलच्या पुढच्या बाजूला एक स्टायलिश ग्रिल देण्यात आली आहे.

ही कार फ्रंट एलईडी लाइट आणि टेललाइटसह येते. यात मोठे टायर आणि अलॉय व्हील्स देण्यात आले आहेत. कारच्या आतील भागात रंगाचे पर्याय उपलब्ध आहेत. कारला मागील बाजूस अतिशय स्लीक डिझाइन देण्यात आली आहे. ही कार काही सेकंदात हाय स्पीड गाठते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alcohol Viral Video: दारूमुळे होतो कॅन्सर? काय आहे सत्य? जाणून घ्या...

Harshvardhan Patil News : शरद पवारांकडून भाजपला सर्वात मोठा धक्का; पश्चिम महाराष्ट्रातील बडा नेता हाती तुतारी घेणार, वाचा

Maharashtra News Live Updates: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार?

Nashik News : दोन मैत्रिणींचा जाच असह्य झाला; २३ वर्षीय तरुणाने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Dasara Melava 2024 : रुग्णालयातून डिस्चार्ज, जरांगे थेट मैदानात! आरक्षणासाठी घेणार दसरा मेळावा

SCROLL FOR NEXT