DA hike, bringing relief to lakhs of employees and pensioners. saam tv
बिझनेस

DA Hike : दर महिन्याला ११२५० रुपयांचा क्लेम; सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्याबाबत सरकारची मोठी अपडेट

Dearness Allowance update News : महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने बाल शिक्षण भत्ता (CEA) आणि हॉस्टेल सब्सिडीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

Namdeo Kumbhar

Children Education Allowance rules for central government employees : डीए म्हणजेच महागाई भत्त्याबाबत केंद्रीय कर्मचारी मागील काही महिन्यांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा सुरू आहे, पण महागाई भत्त्याबाबत केंद्राकडून कोणतीही घोषणा अद्याप करण्यात आली नाही. पण केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना एक दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडून विशिष्ट भत्त्याची घोषणा केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारने बाल शिक्षण भत्त्याची (Children Education Allowance - CEA) घोषणा केली. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला बाल शिक्षण भत्ता (सीईए) मिळवण्याची परवानगी देते. या भत्त्यामध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणावर केलेला खर्च, तसेच 'हॉस्टेल सब्सिडी'चा समावेश असतो. आता केंद्र सरकारकडून या भत्त्याबाबत मोठी अपडेट दिली आहे.

सरकारकडून FAQs जारी, नेमका नियम काय ? -

बाल शिक्षण भत्त्याच्या पात्रतेवर अनेक प्रश्न कर्मचार्‍यांच्या मनात घोंघावत आहेत. सेवानिवृत्ती किंवा बडतर्फ झाले तर बाल शिक्षण भत्ता मिळतो का? पूर्व-प्राथमिक वर्गांसाठीही दावा करता येईल का? सरकारकडून वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्न जारी केले आहेत.

केंद्र सरकारच्या नियमांनुसार, सरकारी कर्मचारी आपल्या मुलांच्या शिक्षणावर झालेल्या खर्चाची परतफेड मिळवण्यास पात्र आहे. सरकारने बाल शिक्षण भत्त्याची परतफेड रक्कम दरमहा ₹२,८१२.५ निश्चित केली आहे. 'हॉस्टेल सब्सिडी' देखील दरमहा ₹८,४३७.५ निश्चित करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रति महिना ₹११,२५० इतके रूपयांचा प्रतिपूर्ती मिळेल.

सरकारने काय दिले स्पष्टीकरण ?

शैक्षणिक वर्षादरम्यान सेवानिवृत्त झाले, बडतर्फ केले अथवा सेवेतून काढून टाकल्यास सरकारी कर्मचारी बाल शिक्षण भत्त्याचा (CEA) दावा करू शकतो की नाही? हा प्रश्न प्रत्येक केंद्रीय कर्मचाऱ्यांना पडला आहे. वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये (FAQs) सरकारने या प्रश्नांचे उत्तर दिलेय. जर एखादा सरकारी कर्मचारी शैक्षणिक वर्षादरम्यान सेवानिवृत्त झाला, बडतर्फ झाला किंवा सेवेतून काढून टाकला तर सीईए/वसतिगृह अनुदान त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरपर्यंत दिले जाईल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

नोकरीतून निवृत्त झाले अथवा निलंबन झाले तर सीईए मिळेल का? असाही प्रश्न वारंवार विचारला जात आहे. यावर सरकारकडून उत्तर देण्यात आले. सक्षम प्राधिकारी सेवा समाप्तीपासून पुनर्नियुक्तीपर्यंतच्या कालावधीचा विचार कसा करतात यावर हे ठरेल, असे सांगण्यात आले.

हॉस्टेल सब्सिडीवर काय स्पष्टीकरण -

हॉस्टेल सब्सिडीच्या प्रतिपूर्तीसाठी सरकारी कर्मचारी ₹८,४३७.५ च्या मासिक वसतिगृह अनुदानाचा दावा करू शकतो. पण त्यासाठी काही अटी आहेत. हे फक्त कर्मचाऱ्याच्या घरापासून किमान ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या वसतिगृहात शिकणाऱ्या मुलांनाच लागू होते. हॉस्टेल सब्सिडी आणि बाल शिक्षण भत्ता (CEA) यांचा दावा एकाच वेळी केला जाऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सामचा दणका, प्रशासनाला जाग, येरवडा प्रकरणी सरकार अॅक्शन मोडवर

Maharashtra News Live Update: भाईंदर पूर्वेत भीषण आग

खरातसारख्या भोंदूंच्या जाळ्यात महिला कशा अडकतात? मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घ्या...

IPL 2026 : मॅचविनर खेळाडूला RCB नं संघाबाहेर काढले, राजस्थानचा डेथ ओव्हर स्पेशालिस्टला आराम

लाडकी बहीण योजना बंद करा, हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारले

SCROLL FOR NEXT