Indian Railway Rule Saam tv
बिझनेस

Indian Railway Rule : लहान मुलांसोबत रेल्वेतून प्रवास करताय ? आधी नियम तर वाचा, पैशांची होईल बचत

Ticket Rules : ट्रेनने प्रवास करताना आपल्यासोबत लहान मुलं असेल तर आपल्याला वैताग येतो.

कोमल दामुद्रे

Child Fare Rules in Trains : दिवसभरातून लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. भारतीय रेल्वेतून प्रवास करताना आपल्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या माहीत नाही. ट्रेनने प्रवास करताना आपल्यासोबत लहान मुलं असेल तर आपल्याला वैताग येतो. प्रवासात मुलांची चिडचिड होते त्यामुळे मुलांना प्रवासात घेऊन जाणे कठीण होते.

कोणत्याही वाहनांपेक्षा हा प्रवास अधिक आरामदायी वाटतो. अनेक वेळा लहान मुलांना सोबत घेऊन जाताना आपण तिकीट काढायला विसरतो पण अशावेळी घाबरण्याची काळजी नाही.

भारतीय रेल्वे (Railway) अधिनियमानुसार (Rules) रेल्वेतून ५ वर्षांपेक्षा लहान असणाऱ्या मुलांनी रेल्वेतून प्रवास केल्यास कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही. जुन्या रेल्वेच्या नियमानुसार तुम्ही मुलांसोबत ट्रेनमधून प्रवास करु शकता.

1. भारतीय रेल्वेचा 5 वर्षांखालील मुलांसाठी नियम काय आहे?

जर तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करत असाल तर 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी तिकीट बुक करण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला मुलांसाठी तिकीट बुक करायचे असेल तर त्यासाठी कोणतेही बंधन नाही

2. मुलांसाठी तिकीट आणि बर्थ विकत घेतल्यास काय फायदा होईल?

जर तुम्हाला मुलांचे तिकीट काढायचे नसेल तर तुम्ही मोफत प्रवास (Travel) करुन त्याचा लाभ घेऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे भरावे लागणार नाही. यामुळे आपल्या पैशांची (Money) बचतही होईल.

3. मुलांसाठी तिकीट आणि बर्थ बुक करण्यासाठी किती शुल्क आकारले जाईल?

जर तुम्हाला लहान मुलासाठी तिकीट आणि बर्थ बुक करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या व्यक्तीला लागतात तितके भाडे आकारले जाईल. भारतीय रेल्वेच्या 06.03.2020 च्या परिपत्रकात हा नियम स्पष्ट करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा, रस्ता रोको आंदोलन करून अकोला जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन

Election Commission: २०२९च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोठा बदल होणार; मतदान केंद्रांची संख्या वाढणार, RTIमधून खुलासा

Live Update : शिंदे की ठाकरे, शिवसेना कुणाची? कोर्टात नेमकं काय झालं? वाचा A टू Z अपडेट

Diabetes and Modak: डायबिटीजचे रूग्ण मोदक खाऊ शकतात का? जाणून घ्या

SET Exam 2026: महत्वाची बातमी! सेटची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली, सप्टेंबरमध्ये 'या' दिवशी असेल पेपर

SCROLL FOR NEXT