कार इन्श्युरन्स नसताना वाहन चालवल्यास दंड आणि तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते./AI Image saam tv
बिझनेस

Car Insurance Fine : कार इन्श्यूरन्स नसेल तर किती कापणार चालान, किती दंड भरावा लागेल? जेलमध्येही जावं लागणार?

fine for driving car without insurance in india : इन्श्यूरन्सविना कार रस्त्यावर चालवणं कायदेशीर गुन्हा आहे. वाहतूक पोलिसांनी पकडलं तर, दंड आकारतीलच, पण त्यासोबतच तुरुंगातही जावं लागू शकतं. जाणून घ्या नियम...

Saam Tv

स्वतःची कार असावी, मनसोक्त फिरावं असं सगळ्यांनाच वाटतं. कार खरेदी केली की ड्रीम कार अशी कॅप्शन देऊन सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतात. त्यावर लाईक्स आणि कमेंट किती आल्या हे वारंवार जाऊन बघतात. पण हीच ड्रीम कार खरेदी करताना बहुतांश लोक केवळ ईएमआय, मायलेज आणि फीचर्स बघतात. अनेकदा कार इन्श्युरन्सकडे दुर्लक्ष करतात. काही तर इन्श्युरन्स पॉलिसीची मुदत संपल्यानंतर अनेक महिने उलटून गेले तरी रिन्यू करत नाहीत. इन्श्युरन्सविनाच कार चालवतात. असं करून केवळ जोखीमच नाही तर, कायद्याचं आणि नियमांचं उल्लंघनही करतात. भारतात प्रत्येक वाहनासाठी किमान थर्ड पार्टी इन्श्युरन्स असणे गरजेचे आहे.

कारचे इन्श्युरन्स नसेल आणि वाहतूक नियमन करताना ट्रॅफिक पोलिसांनी तुम्हाला पकडले तर दंडात्मक कारवाई केली जाईल. इतकेच नाही तर काही प्रकरणात तुरुंगवासाच्या शिक्षेची देखील तरतूद आहे. मग तुमची कार पेट्रोल, डीझेल, सीएनजी असो की इलेक्ट्रिक. नियम सर्वांनाच सारखे लागू होतात. त्यामुळे कार घेऊन जाताना इन्श्युरन्स पॉलिसी अॅक्टिव्ह आहे की नाही याची खात्री करून घ्यायला हवी. तुमच्या या निष्काळजीपणामुळे मोठे नुकसान सोसावे लागू शकते.

किती दंड आकारला जातो?

मोटर वाहन कायद्यानुसार, भारतात अवैध इन्श्युरन्स किंवा इन्श्युरन्सविना वाहन हाकणे गुन्हा मानला जातो. जर पहिल्यांदा इन्श्युरन्सविना वाहन चालवल्याप्रकरणी कारवाई झाली तर, त्याला २००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. तसेच काही विशिष्ट प्रकरणात तीन महिन्यांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची देखील तरतूद आहे. दुसऱ्यांदा हीच चूक केली तर, दंडाची रक्कम ४ हजारांपर्यंत होऊ शकते. याशिवाय शिक्षाही अधिक कठोर केली जाऊ शकते.

अनेक राज्यांत तर वाहतूक पोलीस डिजिटल व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून घटनास्थळीच इन्श्युरन्स अॅक्टिव्ह आहे की नाही हे तपासतात. त्यामुळे केवळ फोटो किंवा जुनी कागदपत्रे दाखवून कारवाईपासून वाचणे अशक्य आहे. एखाद्या अपघातावेळी कारचा इन्श्युरन्स नसेल तर झालेल्या नुकसानीचा संपूर्ण खर्च करावा लागतो. त्यामुळेच वेळेवर इन्श्युरन्स रिन्यू करणे गरजेचे आहे.

कार इन्श्युरन्स केवळ ट्रॅफिक चालानपासून वाचण्यासाठी नाही तर आर्थिक सुरक्षाही मिळते. तुमच्या कारने दुसऱ्या एखाद्या वाहनाला धडक दिली किंवा एखाद्या व्यक्तीचे, मालमत्तेचे नुकसान झाले तर, थर्ड पार्टी इन्श्युरन्स कायदेशीरदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या मदतगार ठरतो. इन्श्युरन्स नसेल तर संपूर्ण खर्च तुमच्या खिशातून द्यावा लागू शकतो.

आजच्या घडीला अनेक कंपन्या डिजिटल इन्श्युरन्स रिन्युअलची सुविधा देतात. अवघ्या काही मिनिटांतच पॉलिसी पुन्हा अॅक्टिव्ह केली जाते. बेसिक थर्ड पार्टी इन्श्युरन्स ऐवजी कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्श्युरन्स घेणे अधिक फायद्याचे ठरते, असे या क्षेत्रातील तज्ज्ञमंडळी सांगते. त्यामुळे तुमच्या कारचे नुकसान झाले तरी त्याचे कव्हर मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Trekking Places: मान्सूनमध्ये ट्रेकिंगचा प्लॅन करताय? मग, मुंबई पुण्याजवळील 'या' ७ किल्ल्यांना नक्की भेट द्या

EPF update: इन हँड सॅलरी वाढणार, पीएफ नियम बदलले; कोणाला कसा फायदा होणार? जाणून घ्या

Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव कारने २ वर्षीय श्रृतिकाला चिरडलं, डॉक्टरविरोधात गुन्हा; थरारक VIDEO समोर

Maharashtra News Live Update: रायगडच्या दरी-डोंगरांत धबधबे प्रवाहीत; पर्यटनाला सुरुवात

Live Location Sharing : WhatsApp, Instagram वर तुम्हीही शोधू शकता मित्रांचे लाइव्ह लोकेशन; जाणून घ्या या सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT