2024 Nissan X-Trail x
बिझनेस

Nissan X-Trail: Nissan ची नवीन SUV लाँच, मजबूत पॉवरट्रेनसह टोयोटा फॉर्च्युनरचा देणार टक्कर

2024 Nissan X-Trail: निसान कंपनीने CMF-C प्लॅटफॉर्मवर नवीन Nissan X-Trail कार आणलीय. ही कार भारतात तीन रो व्हेरियंटमध्ये विकली जाईल. या नवीन SUV मध्ये कंपनीने 1.5 लीटर थ्री-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन दिलंय.

Bharat Jadhav

Nissan India ची बहुप्रतिक्षित SUV X-Trail भारतीय बाजारात लॉन्च झाली. या एसयूव्हीला दमदार पॉवरट्रेन देण्यात आली आहेत. या एसयूव्हीमध्ये सौम्य हायब्रिड इंजिन आहे. तसेच ही पहिली कार आहे त्यात कंपनीने व्हेरिएबल कॉम्प्रेशन टर्बो तंत्रज्ञान वापरले आहे. तसेच कंपनीने ही कार तीन रंगात लॉन्च केलीय. बाजारात ही कार टोयोटा फॉर्च्युनर कारला टक्कर देईल.

या नवीन SUV कारमध्ये यात स्प्लिट हेडलॅम्पसह V मोशन ग्रिल देखील आहे. तसेच यात प्लास्टिकच्या आवरणासह गोल आकाराच्या चाकांच्या कमानी आहेत. तर डायमंड कट ॲलॉय व्हील आणि एलईडी टेल लॅम्प्सही एसयूव्हीमध्ये देण्यात आलेत. कंपनीने ड्युअल झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टमसह ड्युअल पॅन पॅनोरमिक सनरूफ देखील या कारला दिले आहेत.

या कारमध्ये 8 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमसह 12.3 इंचाचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले देखील आहे. यासोबतच यामध्ये वायरलेस चार्जिंग सिस्टीम, कीलेस एंट्री, पुश स्टार्ट बटण, ड्रायव्हिंग मोड, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी आधुनिक फीचर्स देण्यात आली आहेत. यात 360 डिग्री कॅमेरा देखील देण्यात आलाय.

निसान इंडियाने आपल्या नवीन एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 49.92 लाख रुपये ठेवलीय. पर्ल व्हाईट, डायमंड ब्लॅक आणि शॅम्पेन सिल्व्हर अशा तीन रंगांमध्ये हे बाजारात विकले जाईल. ही कार बाजारात टोयोटा फॉर्च्युनरसारख्या एसयूव्हीला टक्कर देईल. नवीन निसान एक्स-ट्रेल बाजारात फॉर्च्युनरशी स्पर्धा करेल. कंपनीने टोयोटा फॉर्च्युनरमध्ये 2.7 लीटर पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन 166 PS च्या पॉवरसह 245 Nm चा पीक टॉर्क निर्माण करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manikrao Kokate : मोठी बातमी! मंत्री माणिकराव कोकाटेंना अटक होणार, वॉरंट निघाले

Latest Blouse Hand Designs: या 5 पॅटर्नमध्ये ब्लाऊजच्या हाताची डिझाईन शिवा, कोणतीही साडी नेसली तरी सुंदरच दिसेल

KDMC News : राज ठाकरेंना आणखी एक धक्का, शहराध्यक्षांचा मनसेला जय महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: परभणीत राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील दोन्ही गट स्वबळावर लढण्यासाठी ठाम

Hair Care: हजारो रुपयांच्या केराटिन ट्रीटमेंट्स कशाला? या ७ घरगुती कंडिशनरने केस बनवतील सिल्की आणि सॉफ्ट

SCROLL FOR NEXT