Nissan Magnite KURO Edition launched with bold looks and 55+ safety features in India 
बिझनेस

Nissan Magnite KURO: एक नाही तब्बल ५५ सेफ्टी फीचर्ससह बाजारात आली Nissan Magniteची नवी ऍडिशन; जाणून घ्या किंमत, मायलेज

Magnite KURO Edition: निसान मॅग्नाइटने KURO ऍडिशन बाजारात आणली आहे. या कारमध्ये ५५ हून अधिक सुरक्षा फीचर्स देण्यात आली आहेत. तर आणि २० हून अधिक प्रथम श्रेणीमधील फीचर्स आहेत. याशिवाय या कारच्या बाह्य आणि अंतर्गत भागाला गडद थीम टच देण्यात आलाय.

Bharat Jadhav

  • निसानने Magnite KURO Edition बाजारात आणली असून ५५ हून अधिक सुरक्षा फीचर्स दिली आहेत.

  • या SUV ला गडद काळ्या थीमचा लूक आणि प्रीमियम इंटिरीअर्स आहेत.

  • यामध्ये २० पेक्षा जास्त प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.

  • किंमत बजेटमध्ये असून मायलेज आणि सेफ्टीमध्ये ही कार उत्कृष्ट आहे.

निसान इंडियाने ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठ नव्या ऍडिशनला बाजारात उतरवलंय. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही मॅग्नाइटची कुरो ऍडिशन बाजारात आणली आहे. या कारमध्ये ५५ हून अधिक सुरक्षा फीचर्स आणि २० हून अधिक प्रथम श्रेणीतील फीचर्स समाविष्ट करण्यात आली आहेत. या नवीन ऍडिशनच्या बाह्य आणि अंतर्गत भागाला गडद थीमचा टच देण्यात आला आहे. मॅग्नाइट कुरोमध्ये आणखी काय खास आहे आणि ते खरेदी करणे फायदेशीर ठरेल का? हे जाणून घेऊया. (Nissan Magnite KURO Edition Launched with 55+ Safety Features)

नवीन निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल ऍडिशनची किंमत ८.३० लाख ते १०.८६ लाख रुपयांपर्यंत आहे. तुम्हाला ही कार घ्यायची असेल तर तुम्ही ही कार फक्त ११ हजार रुपयांचे टोकन रक्कम देऊन बुक करू शकतात. KURO स्पेशल ऍडिशन जपानी Boldest Black तत्वावर आधारित आहे. यात इंटीरियर ब्लॅक थीम आणि जपानी-प्रेरित डिझाइन आहे.

नवीन ऍडिशनच्या काही ठळक फीचर्सबद्दल सांगायचे झाले तर, 'KURO' लोगो मॅग्नाइटमध्ये दिसेल. याशिवाय,१६-इंच डायमंड कट अलॉय व्हील्स, ब्लॅक डोअर हँडल, पियानो ब्लॅक कलर फ्रंट ग्रिल, फ्रंट आणि रियर स्किड प्लेट्स आणि ग्लॉस ब्लॅक रूफ रेल यांसारखी फीचर्स काळ्या रंगात उपलब्ध आहेत.

याशिवाय या नवीन ऍडिशन सिग्नेचर ब्लॅक एलईडी हेडलॅम्प देखील दिसतात. इंटीरियरबद्दल बोलायचे झाले तर, येथे मिडनाईट थीम दिसते. पियानो ब्लॅक फिनिश गियर शिफ्ट नॉब देखील देण्यात आला आहे. कारमध्ये ब्लॅक वायरलेस चार्जर आणि डॅश कॅमची सुविधा देखील आहे. सुरक्षेसाठी या वाहनात ६ एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग, EBD, ESC, TCS, HSA, ब्रेक असिस्ट आणि TPMS सारखे फीचर्स आहेत. मॅग्नाइटला सुरक्षिततेमध्ये ५-स्टार रेटिंग मिळाले आहेत.

डायमेंशन

लांबी - 3994mm

रुंदी - 1758mm

उंची - 1572mm

व्हीलबेस- 2500mm

ग्राउंड क्लीयरेंस-205mm

निसान मॅग्नाइट कुरो स्पेशल ऍडिशन खरेदी करावी का?

निसान मॅग्नाइट ही एक चांगली कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. तिचे बेस मॉडेल सुमारे ६.१४ लाख रुपयांपासून सुरू होते. फक्त नवीन ऍडिशनसाठी २ लाख रुपये जास्त देणे फायदेशीर नाही. त्यामुळे तुम्ही इतर पर्याय शोधू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: 'या' दिवशी लागणार वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण; 3 राशींच्या व्यक्तींचं नशीब फळफळणार

Hyperloop Rail: देशातील पहिली हायपरलूप रेल्वे कधी धावणार? जाणून घ्या, नव्या रेल्वेचा मार्ग

Ration Card Holder: राज्यातील 3 हजार रेशन कार्डधारकांना नाही मिळणार रेशन; काय आहे कारण?

Maratha Reservation : मराठा आरक्षणावरून वातावरण तापलं; मनोज जरांगे समर्थकांकडून बीड जिल्हा बंदची हाक, VIDEO

EPFO 3.0 लाँन्च होण्यास का होतोय विलंब? कोणत्या पाच नियमात होतील बदल? जाणून संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT