New Labour Law Saam tv
बिझनेस

New Labour Law: तुमचा पगार वाढणार की कमी होणार? नवीन कामगार कायद्याचा कर प्रणालीवर होणार परिणाम; वाचा सविस्तर

New Labour Code Update: सरकारने नवीन कामगार कायदा लागू केला आहे. याअंतर्गत बेसिक सॅलरी तुमच्या सीटीसीच्या ५० टक्के असणार आहे. यामुळे तुमचा पगार वाढणार की कमी होणार ते जाणून घ्या.

Siddhi Hande

नवीन कामगार कायदा लागू

तुमची बेसिक सॅलरी वाढणार

हातात येणारा पगार कमी होणार की वाढणार?

देशात नवीन कामगार संहिता लागू झाली आहे. नवीन कामगार संहिता लागू झाल्यामुळे तुमच्या पगारावर त्याचा परिणाम होणार आहे. तुमची बेसिक सॅलरी तुमच्या सीटीसीच्या अर्धी असणार आहे. दरम्यान, या बदलामुळे तुमच्या हातात येणारा पगार कमी होऊ शकतो. मात्र, तुमचा रिटायरमेंट फंड मात्र वाढणार आहे. टेम होम सॅलरीवर काय परिणाम होणार ते जाणून घ्या.

काय आहे नियम?

नवीन कामगार कायद्याअंतर्गत तुमची बेसिक सॅलरी सीटीसीपेक्षा अर्धी असणार आहे. जर तुमचा एचआरए, वाहतूक भत्ता, ओव्हरटाईम हे जर पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर अतिरिक्त रक्कम मूळ वेतनात जोडली जाईल. दरम्यान, तज्ज्ञांच्या म्हणण्यांनुसार, कंपन्या मूळ पगारात ५० टक्क्यांपर्यंत वाढ करणार नाही तर भत्त्यांमध्ये बदल करतील.

हातात येणारा पगार कमी होईल का?

तुमच्या पगारात जरी बदल होणार नसला तरीही हातात येणाऱ्या टेम होम सॅलरीवर परिणाम होणार आहे. याचे कारण म्हणजे पीएफ आणि ग्रॅच्युटी. पीएफ आणि ग्रॅच्युटीची गणना आता नवीन वेतन प्रणालीनुसार केली जाईल. जसजसी तुमची बेसिक सॅलरी वाढेल तसा पगारातील पीएफचा हिस्सादेखील वाढेल. खिशात कमी पैसे असले तरी भविष्य निर्वाह निधी आणि ग्रॅच्युटीमध्ये जास्त पैसे जमा केले जाणार आहेत.

कर प्रणालीवर होणार परिणाम

या पगारातील बदलाचा परिणाम कर प्रणालीवरही अवलंबून असतो. जुन्या कर प्रणालीत पीएफ योगदानावर तुम्ही कलम 80C अंतर्गत कपात मिळवू शकता. नवीन कर प्रणालीत कपात मिळते. नवीन कर प्रणालीत कमी कपात होते. मात्र, तुमच्या रिटारयमेंटनंतरच्या फंडवर चांगला परिणाम होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT