New Labour Code Saam Tv
बिझनेस

Labour Code Rules: ४ दिवस काम अन् ३ दिवस सुट्ट्या; नवीन कामगार कायद्यात कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

New Labour Code Rules: नवीन कामगार कायदा लागू करण्यात आला आहे. नवीन कामगार कायद्यात आता कर्मचाऱ्यांना ४ दिवस ३ दिवस सुट्टी असा नियम लागू होऊ शकतो.

Siddhi Hande

नवीन कामगार कायदा लागू

आता कर्मचाऱ्यांना ४ दिवस काम ३ दिवस सुट्टी

आठवड्याला ४८ तास काम करणे बंधनकारक

कर्मचाऱ्यांसाठी नवीन कामगार कायदा लागू करण्यात आला आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना ४ दिवस काम आणि ३ दिवस सुट्टी मिळू शकते. दरम्यान, ३ दिवस सुट्ट्या असल्या तरीही कर्मचाऱ्यांना जास्त दिवस काम करावे लागू शकते. कर्मचाऱ्यांना आठवड्यातील ४ दिवस १२ तास काम करावे लागणार आहे.

नवीन कामगार कायदा (New Labour Code)

आता कर्मचाऱ्यांना आठवड्याला ४ दिवस काम आणि ३ दिवस काम करता येणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना पर्याय देण्यात आला आहे. सरकार या नवीन नियमाअंतर्गत आठवड्यात ४८ ताल काम करावे लागणार आहे. हे कामाचे तास ४ दिवसात पूर्ण केले तरी चालणार आहे.

या नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना ४ दिवस १२ तास काम करावे लागणार आहे. तीन दिवस सुट्ट्या मिळणार आहे. ज्या क्षेत्रांमध्ये वर्क फ्रॉम होम किंवा लवचिक वेळापत्रक लागू आहे. त्यांना याचा फायदा होणार आहे.

कामगार तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे, हा नियम बंधनकारक नाही. त्यामुळे कंपनीला चार दिवसांच्या कामाचे मॉडेल स्वीकारणे बंधनकारक असणार नाही. कंपनी आणि कर्मचारी दोघांची संमती असेल तरच अंबलबाजवणी होऊ शकतात. नवीन नियमानुसार, काही महत्त्वाच्या अटीही लागू करण्यात आल्या आहेत. आता कर्मचाऱ्यांना ४८ तासांपेक्षा जास्त काम करावे लागणार नाही, असं कंपन्यांनी सांगितले आहे.

नवीन कामगार कायद्यात दैनंदिन कामाच्या तासांऐवजी साप्ताहिक कामाच्या तासांवर लक्ष केंद्रित केले जाते. यामुळे कंपन्यांना शिफ्ट आणि कामाचे वेळापत्रक तयार करताना कोणतीही अडचण येणार नाही. हे मॉडेल आयटी, आयटीएस, ग्लोबल कॅपॅबिलिटि सेंटर, मार्केटिंग क्षेत्रांमध्ये सहजपणे लागू केले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसेकडून आजपासून सह्यांची मोहीम

Soaked Walnut Vs Dry Walnuts: भिजवलेले की सुके, मेंदूच्या आरोग्यासाठी कोणते अक्रोड बेस्ट?

Palak Paratha Recipe: नाश्त्यासाठी बनवा हेल्दी, पौष्टिक आणि चविष्ट पालक पराठा, वाचा सोपी रेसिपी

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३,००० रुपये जमा होणार? मोठी अपडेट समोर; २,१00 रुपयांवर सरकारचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT