New Labour Law Saam Tv
बिझनेस

New Labour Law: आता ५ वर्षे वाट पाहावी लागणार नाही; कर्मचाऱ्यांना वर्षभरात मिळणार ग्रॅच्युटी; वाचा नवीन नियम

New Labour Code Gratuity Rules: १ एप्रिलपासून नवीन कामगार संहिता लागू झाली आहे. यानुसार आता १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी मिळणार आहे. याआधी तुम्हाला ५ वर्ष वाट पाहावी लागत होती.

Siddhi Hande

नवीन कामगार संहिता लागू

आता १ वर्ष पूर्ण झाल्यावर कर्मचाऱ्यांना मिळणार ग्रॅच्युटी

५ वर्षे वाट पाहण्याची गरज नाही

केंद्र सरकारने नवीन कामगार संहिता लागू केली आहे. नवीन कामगार कायद्यात अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये ग्रॅच्युटीच्याही नियमात बदल केले आहेत. आता तुम्हाला एका वर्षात ग्रॅच्युटी मिळणार आहे. फिक्स्ड टर्म कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीसाठी पाच वर्षांची वाट पाहायची गरज नाही. या नवीन नियमांमुळे कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

आता एका वर्षात मिळणार ग्रॅच्युटी (Now Employee Get Gratuity in One Year)

सुरुवातीला कंपनी कर्मचाऱ्यांना कंत्राटी किंवा पर्मानंट स्वरुपात कामावर ठेवायची. आता एका फिक्स्ड टर्मसाठी म्हणजे एका ठरावीक कालावधीसाठी कर्मचाऱ्यांना काम करावे लागते. यासाठी १-२ वर्षांचे लेख कॉन्ट्रॅक्ट तयार केले जाते. या कर्मचाऱ्यांनादेखील इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच सॅलरी मिळणार आहे.

सध्याचा (Payment of Gratuity Act, 1972) कायद्यानुसार, कर्मचाऱ्याने ५ वर्षांची सर्व्हिस पूर्ण केल्यानंतरच त्यांना ग्रॅच्युटी मिळत होती. परंतु आता तुम्हाला वर्षभरातच ग्रॅच्युटी मिळणार आहे. जर तुम्ही एक वर्ष ४ महिन्यासाठी काम केले तर त्या कालावधीसाठी ग्रॅच्युटी तुम्हाला मिळणार आहे. प्रोजेक्ट बेस्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहेत.

कर्मचाऱ्यांना किमान एक वर्ष काम करण्याची मुदत पूर्ण करणे आवश्यक आहे. जर तुम्ही एका वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी काम केले तर ग्रॅच्युटी मिळणार नाही. तुम्ही काम केलेल्या महिन्याच्या किंवा दिवसानुसार ग्रॅच्युटी मिळणार आहे.

नियमात का बदल?

लहान प्रोजेक्टवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीचा फायदा घेता येत नाही. या कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन हा बदल केला आहे. ग्रॅच्युटी मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांना ५ वर्षे वाट पाहावी लागते. परंतु अनेकदा कर्मचारी तेवढे दिवस कामदेखील करत नाही. त्यामुळे त्यांना ग्रॅच्युटी मिळत नाही. त्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्य सरकारने माहितीच्या अधिकारात बदल

या 5 चुकांमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स

ठाकरेसेनेचा व्हीप फुटीर खासदारांनी झुगारला, बंडखोर खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार?

Friday Horoscope: अनोळखी लोकांवर लगेच विश्वास ठेवणं टाळा; वाचा आजचं राशीभविष्य

Famous Influencer Death: प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसरचं ३६ व्या वर्षी निधन; पोटाच्या कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

SCROLL FOR NEXT