भारतीय रिझर्व्ह बँकेने १३ फेब्रवारी रोजी मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले होते. बँकेतील ग्राहकांना एक रुपये काढणे देखील अवघड झाले होते. त्यामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली होती. घोटाळ्यानंतर काही दिवसांनी आरबीआयने बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा आहे. आता ग्राहकांना खात्यातून २५००० रुपये काढता येणार आहे. २७ फेब्रुवारीपासून ग्राहकांना खात्यातून पैसे काढता येणार आहे. १२२ कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस झाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने कडक कारवाई केली होती.
आरबीआयद्वारे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध लादले होते. त्यामुळे बँकेच्या ग्राहकांना मोठा धक्का बसला होता. रिपोर्टनुसार, आरबीआयने निर्बंध शिथील करत न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ५० टक्क्यांहून अधिक ग्राहकांना १०० टक्के पैसे काढता येणार आहेत. निर्बंध लागू केल्यानंतर दादरमधील बँकेच्या शाखेबाहेर मोठी गर्दी जमा झाली होती. त्यानंतर काल सोमवारी बँकेने खातेदारांना मोठा दिलासा दिला आहे. कर्जाचं वाटप करण्यावरही निर्बंध लादले होते.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे सीईओ देवर्षी घोष यांच्या तक्रारीनंतर जनरल मॅनेजर हितेश मेहता याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. हितेश मेहता हा बँकेचा हेड्स ऑफ अकाऊंट्स दखील होता. त्याने बँकेतील पदाचा दुरुपयोग करत १२२ कोटी रुपयांचा घोटाळा केला होता. त्यानंतर भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत ३१६ नुसार एफआयआर नोंदवला आला. न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.
घोट्याळ्याचं गांभीर्य लक्षात घेता भारतीय रिझर्व्ह बँकेने NICB बोर्डाला एक वर्षासाठी हटवलं. त्यानंतर त्यावर एसबीआयचे माजी मुख्य व्यवस्थापक श्रीकांत यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली होती. या बँकेच्या २८ शाखा आहेत. त्यात मुंबईतील अंधेरी, वांद्रे, बोरिवली, चेंबूर, घाटकोपर, गिरगाव, गोरेगाव, नरीमन प्वाइंट, कांदिवली, मालाड, मुलुंड, सांताक्रूझ आणि वर्सोवामध्ये शाखा आहेत. मुंबई व्यतिरिक्त नवी मुंबई, ठाणे, पालघर, पुणे आणि सूरतमध्ये शाखा आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.