Dharashiv Farmers Saam Tv
बिझनेस

Farmers Scheme: चंद्रपूर जिल्हा बँकेची शेतकरी कल्याण योजना सुरू; वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra News : चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेने शेतकऱ्यांसाठी गंभीर आजारांवरील उपचारासाठी आर्थिक मदत योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकरी कुटुंबांना ४०,००० रुपयांपर्यंत साहाय्य मिळणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

चंद्रपूर : शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजारांच्या उपचारासाठी आता आर्थिक मदत मिळणार आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही योजना ११ ऑक्टोबरपासून, तुकडोजी महाराज स्मृतिदिनी सुरू करण्यात येणार आहे. या योजनेसाठी शेतकरी व बँकेचे सभासद यांची मोठी मागणी होती. अखेर बँकेने ती दखल घेतली असून योजनेला मंजुरी दिली आहे.

योजनेअंतर्गत बँकेमार्फत देण्यात येणारी मदत ही फक्त अर्जदार शेतकरी, कर्जदार व त्यांचे कुटुंबीय यांनाच मिळणार आहे. याशिवाय हिंदू वारसा कायदा ७५ (२) देखील योजनेत लागू राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपचार व शस्त्रक्रिया खर्चाच्या ३० टक्के रक्कम किंवा कमाल ४०,००० रुपये, यापैकी जे कमी असेल ती आर्थिक मदत शेतकऱ्यांना देण्यात येईल. त्यामुळे अचानक मोठा खर्च झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

योजनेअंतर्गत कर्करोग, हृदयविकार, डोक्याचे आजार, अपघातात झालेल्या गंभीर जखमा व त्यावरील उपचार यासाठी साहाय्य दिले जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांना उपचारांसाठी मोठा आधार मिळणार असून वैद्यकीय खर्चाचा ताण कमी होईल. जिल्हा सहकारी बँकेचे संचालक मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात शेतकरी अनेकदा गंभीर आजारांमुळे मोठ्या संकटात सापडतात.

उपचाराचा खर्च भागवताना त्यांना कर्ज काढावे लागते किंवा आर्थिक फटका बसतो. अशा वेळी बँकेची ही योजना मदतीचा हात ठरणार आहे. ही योजना सुरू झाल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळेल आणि त्यांना आर्थिक सुरक्षिततेची कवच मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भूकंपाच्या धक्क्याने आसाम हादरलं

Car Insurance: कार विमा घेताना 'या' महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा

Maharashtra Politics: ...तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना भेटू नये, शिंदेंच्या मंत्र्यांनी तोफ डागली|VIDEO

TET परिक्षेची तयारी; नोकरी गमावण्याची भीती, शिक्षकाने राहत्या घरात आयुष्य संपवलं, विजेच्या तारेनं...

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळत नसल्यानं नैराश्य, विषारी औषध पिऊन मराठा आंदोलकानं आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT