Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडिलांकडून मिळाली प्रेरणा, ३ वर्षे मोबाईलपासून लांब, २२ व्या वर्षी केली UPSC क्रॅक; IAS नेहा ब्याडवाल यांचा प्रवास

Success Story of IAS Neha Byadwal: आयएएस नेहा ब्याडवाल या सर्वात तरुण आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

देशातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी

नेहा ब्याडवाल यांनी तिसऱ्या प्रयत्नात केली यूपीएससी क्रॅक

३ वर्षे मोबाईलपासून राहिल्या लांब

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) पास करणे हे खूप अवघड आहे. ही स्पर्धा परीक्षा पास करुन तुम्ही प्रशासकीय सेवेत काम करु शकतात. आयएएस पदावर काम करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मेहनत आणि इच्छाशक्तीच्या जोरावर तुम्ही ही परीक्षा पास करु शकतात. आयएएस नेहा ब्याडवाल यांनी खूप कमी वयात यूपीएससी परीक्षा पास केली आहे.

नेहा ब्याडवाल या प्रशासकीय अधिकाऱ्यांची लेक आहे. त्यांचे वडील वरिष्ठ इन्कम टॅक्स ऑफिसर आहेत. वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी यूपीएससी परीक्षा पास केली.

नेहा ब्याडवाल यांचा प्रवास (IAS Neha Byadwal Success Story)

नेहा ब्याडवाल यांचा प्रवास काही सोपा नव्हता. त्यांना या प्रवासात खूप अडचणी आल्या. त्यांना अनेक अपयशांचा सामनादेखील करावा लागला. परंतु त्या डगमगल्या किंवा निराश झाल्या नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरु ठेवले.याचाच परिणाम त्यांना यश मिळाले.

वडिलांकडून मिळाली प्रेरणा

आयएएस नेहा ब्याडवाल यांचे वडील इन्कम टॅक्समध्ये सिनियर ऑफिसर आहे. त्यांचे नाव श्रवण कुमार आहे. नेहा यांचा जन्म जयपूर येथे झाला. परंतु त्या लहानाच्या मोठ्या छत्तीसगडमध्ये झाल्या. त्यांच्या वडिलांनीच त्यांना यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

नेहा यांच्या वडिलांची अनेक ठिकाणी ट्रान्सफर व्हायची त्यामुळे त्यांचे शिक्षणदेखील वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यांनी रायपुरच्या डिबी गर्ल्स कॉलेजमधून पदव्युतर शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी इतिहास, अर्थशास्त्र, भूगोल या विषयात ग्रॅज्युएशन केले. (Youngest IAS Officer Neha Byadwal)

यूपीएससी परीक्षा पास करण्यापूर्वी त्यांनी अनेकदा कर्मचारी निवड आयोग म्हणजे SSC परीक्षा पास केली. परंतु त्यांनी या सरकारी नोकरी करण्यास नकार दिला आणि यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. परीक्षेचा अभ्यास करताना त्यांनी तीन वर्षे मोबाईल आपल्यापासून लांब ठेवला होता.

परीक्षेसाठी त्यांनी दिल्लीत कोचिंग घेतली. परंतु त्या परत रायपुर येथे आल्या. त्यांनी सेल्फ स्टडी करण्याचा निर्णय घेतला आणि परीक्षा पास केली. त्यांनी चौथ्या प्रयत्नात ५६९ रँक प्राप्त केली. त्यांना तीन वेळा अपयश आले परंतु त्यांनी हार मानली नाही. शेवटी यूपीएससी परीक्षा पास केलीच.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

NAFED Onion Scam: नाफेड आणि NCCF च्या कांदा खरेदीत पुन्हा घोटाळा; साम टीव्हीच्या हाती अहवाल|VIDEO

लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, गर्लफ्रेंडवर चाकूने सपासप वार; नागपूर हादरले

Rakshabandhan 2025 : रक्षाबंधनानिमित्त लाडक्या भावासाठी बनवा स्पेशल 'सफरचंदाची जिलेबी', नात्यात राहील गोडवा

Woman Fight Video: ऑन ड्युटी वाहतूक पोलिसाला OYO च्या मालकीणीने धू-धू धुतलं, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT