केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. अर्थसंकल्प 2024 मध्ये अल्पवयीन मुलांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जाहीर करण्यात आली आहे. याला 'एनपीएस वात्सल्य', असे नाव देण्यात आले आहे.
या योजनेत तुमचे मूल 18 वर्षांचे झाल्यावर ही योजना सामान्य NPS मध्ये बदलली जाईल. या योजनेद्वारे पालक आपल्या मुलांसाठी पेन्शन प्लान करू शकतात. यातच नेमकी काय आहे ही योजना, याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...
एनपीएस वात्सल्य ही अल्पवयीन मुलांसाठी एक योजना आहे ज्यामध्ये पालक योगदान देऊ शकतात. तुमचे मूल 18 वर्षांचे झाल्यावर ही योजना नियमित एनपीएसमध्ये बदलली जाईल.
सामान्य लोकांच्या सेवानिवृत्तीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) आणली होती. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) पीएफआरडीए कायदा 2013 अंतर्गत एनपीएसचे नियमन करते.
18 ते 70 वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक एनपीएस खाते उघडू शकतो. अनिवासी भारतीय आणि भारतातील परदेशी नागरिक देखील हे एनपीएस खाते उघडू शकतात.
सर्वताधी तुम्हाला eNPS वेबसाइटवर जावे लागेल.
नोंदणीवर क्लिक करावे लागेल.
नवीन नोंदणी पर्याय निवडावा लागेल.
तुम्हाला आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर इत्यादी माहिती शेअर करावी लागेल.
एक OTP येईल. हे भरल्यानंतर तुम्हाला वैयक्तिक माहिती विचारली जाईल.
दरम्यान, एनपीएस खाते कोणत्याही सरकारी किंवा गैर-सरकारी बँकेतून उघडले जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.