Namo Shetkari Yojana Next Installment meta ai
बिझनेस

Namo Shetkari Yojana : नमो शेतकरी योजनेचे ₹६,००० अडकणार? 'हे' १ काम आजच करा, अन्यथा हप्ता बंद

Namo Shetkari Next Installment: नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता मिळण्याआधी शेतकऱ्यांनी ईकेवायसी, आधार माहिती आणि जमिनीच्या नोंदी तपासणं महत्त्वाचं आहे. अधिकृत तारीख जाीहीर झालेली नसल्याने अफवांवर विश्वास ठेवू नये.

Sakshi Sunil Jadhav

शेतीच्या खर्चाचा ताळमेळ साधताना शेतकऱ्यांना मिळणारी सरकारी आर्थिक मदत मोठा आधार ठरते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अशीच महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात ६ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळते. विशेष म्हणजे ही रक्कम केंद्राच्या पीएम -किसान योजनेतून मिळणाऱ्या ६ हजार रुपयांपेक्षा वेगळी आहे. त्यामुळे दोन्ही योजनांसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण १२ हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.

मात्र, शेतजमीन नावावर असणं पुरेसं नाही. योजनेचा हप्ता मिळण्यासाठी लाभार्थ्यांची माहिती, आधार , बँक खातं आणि जमिनीच्या नोंदी यांचे योग्य पडताळणी होणं गरजेची आहे.

हप्ता अडकू नये म्हणून कोणती कामे कराल?

e-KYC पूर्ण असणं गरजेचे : PM-KISAN लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी महत्त्वाची आहे. ती

आधारची माहिती तपासा: आधार कार्डावरील नाव आणि इतर तपशील पीएम किसानच्या नोंदीशी जुळतायेत का? हे तपासा.

बँक खातं आणि DBT तपासा : लाभाची रक्कम ज्या खात्यात जमा होणार आहे ते खातं अॅक्टीव्ह ठेवा. तसेच आधार सीडिंग आणि DBT स्टेटसही तपासणे महत्त्वाचे आहे.

जमिनीच्या नोंदी तपासा : जमीन नोंदीमध्ये चुका किंवा विसंगती असेल तरीही हप्ता रखडू शकतो.

घरबसल्या स्टेटस कसे तपासाल?

शेतकरी PM-KISANच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘Know Your Status’ या पर्यायातून नोंदणी क्रमांकाच्या मदतीने पेमेंट स्टेटस तपासू शकतात. इथे पेमेंट स्टेटस, बँकेचे नाव, UTR आणि Account Credited यासारखी माहिती पाहता येते. e-KYCसाठी OTP, बायोमेट्रिक आणि फेस ऑथेंटिकेशनचे पर्यायही उपलब्ध आहेत.

पुढचा हप्ता कधी येणार?

नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची अधिकृत तारीख सध्या निश्चित झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या चुकीच्या तारखांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत घोषणेची वाट पाहणे योग्य ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5 Best Anarkali Sets: गरब्यासाठी घागरा- चोळी नाही? मग आजच खरेदी करा घेरदार अनारकली सूट

Health Care: शरीराला आतून हळूहळू नुकसान पोहोचवतात 'या' ७ सवयी; आजच बदला तुमची लाइफस्टाइल

Maharashtra : शरद पवारांचं आमंत्रण अन् नरेंद्र मोदी पुन्हा बारामती दौऱ्यावर, नेमकं कारण काय?

Shubman Gill: ‘ते काम अजून अपूर्ण आहे...’ 2027 वर्ल्ड कपसाठी शुभमन गिलचं मोठं लक्ष्य; रोहित-विराटबाबतही सांगितली मनातली गोष्ट

Maharashtra News Live Update: पिक पंचनाम्यात बाधित क्षेत्र कमी दाखवू नका; 100 टक्के नुकसान दाखवा, आमदार कैलास पाटलांची मागणी

SCROLL FOR NEXT