Mutual Fund KYC In Post Office Saam tv
बिझनेस

Mutual Fund KYC: पोस्ट ऑफिसमधून होईल म्युच्युअल फंडची केवायसी; KYC झाली की नाही असं करा चेक

Mutual Fund KYC In Post Office: आता गुंतवणूकदार बँकेत न जाता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये म्युच्युअल फंड केवायसी पूर्ण करू शकतात. हा सोयीस्कर पर्याय भारतातील नवीन आणि विद्यमान म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी फायद्याचा ठरणार आहे.

Bharat Jadhav

  • म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी केवायसी आवश्यक आहे.

  • गुंतवणूकदार आता जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात.

  • या सेवेमुळे बँकेत जाण्याची गरज नाही; प्रक्रिया सुलभ आणि जलद आहे.

  • आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो यांचा समावेश आहे.

कोणत्याही बँकेच्या कामासाठी केवायसी करणं आवश्यक असते. म्युच्युअल फंडात तुम्ही गुंतवणूक केली असेल तर त्यासाठीही तुम्हाला केवायसी करावी लागणार. पण अनेकांना केवायसी करण्याचे काम कंटाळवाणी वाटते. जर तुम्ही म्युच्युअल फंडात पैसे गुंतवतलेत? किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत आहात का? .

तर लक्षात ठेवा त्यासाठी तुम्हाला केवायसी करणं आवश्यक आहे. पण मित्रांनो, तुम्हाला केवायसी किंवा कागदपत्रे सादर करण्याच्या त्रास वाटत असेल, तर आता हे काम घरबसल्या करता येणार आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये म्युच्युअल फंडांशी संबंधित केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता.

टपाल विभाग (DoP) आणि असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) यांनी एक करार केलाय. त्या अंतर्गत देशभरातील १.६४ लाखांहून अधिक टपाल कार्यालये आता केवायसी पडताळणी आणि कागदपत्रे सादर करण्याची सुविधा देतील. त्यामुळे तुम्हाला केवायसीसाठी कुठेही धावपळ करावी लागणार नाही. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुमचा फॉर्म भरू शकता.

केवायसी म्हणजेच नो युवर कस्टमर ही एक प्रक्रिया आहे, यात तुमची ओळख आणि पत्ता पडताळला जातो. यामुळे गुंतवणूक करणारी व्यक्ती खरी आहे याची खात्री केली जाते.

कोणती कागदपत्रे लागतील?

केवायसीसाठी, तुम्हाला यापैकी कोणते तरी एक ओळख आणि पत्ता पुरावा द्यावा लागेल.

आधार कार्ड

पासपोर्ट

ड्रायव्हिंग लायसन्स

मतदार ओळखपत्र

नरेगा जॉब कार्ड (सरकारी अधिकाऱ्याने स्वाक्षरी केलेले)

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमधून जारी केलेले पत्र द्यावे लागेल.

विशेष म्हणजे, पोस्ट ऑफिसचे कर्मचारी स्वतः तुम्हाला फॉर्म भरण्यास, कागदपत्रे तपासण्यास आणि म्युच्युअल फंड कंपन्यांना पाठवण्यास मदत करतील. गुंतवणूकदाराची माहिती केवायसी एजन्सीच्या रेकॉर्डमध्ये केवायसी प्रमाणित स्थितीपर्यंत पोहोचावी यासाठी एएमएफआय त्यांच्या सदस्य म्युच्युअल फंड कंपन्यांच्या वतीने ही सेवा चालवली जात आहे.

केवायसी झाले आहे की नाही हे कसे जाणून घ्यावे?

कोणत्याही म्युच्युअल फंड किंवा रजिस्ट्रारच्या वेबसाइटला भेट द्या.

केवायसी स्थिती तपासण्यासाठी लिंक शोधा.

तुमचा पॅन क्रमांक प्रविष्ट करा.

स्थिती प्रदर्शित होईल - प्रमाणित / नोंदणीकृत / होल्डवर / नाकारलेले

केवायसी स्थितीचा अर्थ काय?

KYC Validated: तुम्ही कोणताही व्यवहार आरामात करू शकता.

KYC Registered: जुनी गुंतवणूक चालेल, नवीन फंडांमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी पुन्हा केवायसी करावे लागेल.

On Hold या Rejected: कागदपत्रे अपूर्ण असू शकतात किंवा पॅन आधारशी लिंक केलेला नसेल, तर प्रथम ते दुरुस्त करणे आवश्यक आहे.

आता, ही सर्व कामे पोस्ट ऑफिसमध्ये केली जातील, ज्यामुळे गावे आणि शहरांमध्येही गुंतवणूक करणे सोपे होईल.

म्युच्युअल फंडासाठी केवायसी आवश्यक आहे का?

हो, कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी केवायसी आवश्यक आहे.

केवायसीसाठी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊ शकतो का?

हो, तुम्ही तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन म्युच्युअल फंडासाठी केवायसी करू शकता.

kyc साठी कोणती कागदपत्रं लागतात?

आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट फोटो आणि सही असलेली फॉर्म आवश्यक असतात.

घरबसल्या केवायसी करण्याचा पर्याय आहे का?

हो, काही म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म डिजिटल केवायसी देखील ऑफर करतात.

घरबसल्या केवायसी करण्याचा पर्याय आहे का?

हो, काही म्युच्युअल फंड प्लॅटफॉर्म डिजिटल केवायसी देखील ऑफर करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युरिया टंचाईमुळे शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Beed Shocking : तरुण डॉक्टरची इंजेक्शन घेऊन आत्महत्या; बीडमध्ये खळबळ

Nashik Honey Trap : नाशिक हनी ट्रॅप प्रकरणाची व्याप्ती वाढली; ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह डॉक्टर्स, व्यावसायिक अडकले

Konkan Railway: गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेची खास रो-रो सुविधा; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Green Coffee : ग्रीन कॉफीने २ महिन्यात १७ किलो वजन झाले कमी, क्रिकेटपटू सरफराज खानने दिल्या सिक्रेट टिप्स

SCROLL FOR NEXT