बिझनेस

Mutual Fund Nomination: म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी पुढचे ७ दिवस अत्यंत महत्त्वाचे; हे काम न केल्यास होणार मोठं नुकसान

Mutual Fund Investors: म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे.

Ruchika Jadhav

Mutual Fund Nominee Deadline:

गुंतवणूक करणे भविष्यासाठी फार महत्त्वाचे असते. नोकरी करणारा प्रत्येक व्यक्ती विविध ठिकाणी आपले पैसे गुंतवतो. सध्या बऱ्याच व्यक्ती शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवता. यामध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तुम्ही देखील म्युच्युअल फंडात पैसे गुंतवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. (Latest Marathi News)

म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींसाठी पुढील 7 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. सेबीने मार्च महिन्यात म्युच्युअल फंड गुंतवणुकदरांसाठी एक परिपत्रक जाहीर केलं आहे. अद्यापही अनेक व्यक्तींना या बाबत माहिती नाही. यामध्ये नॉमिनीच्या नावाची नोंदणी करायची आहे. ज्यासाठी आता फक्त 7 दिवस शिल्लक राहिले.

नॉमिनी नावाची नोंदणी करण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडसाठी नॉमिनीचे नाव निश्चित करून देणे गरजेचे आहे. हा कालावधी उलटून गेल्यास तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

15 जून 2022 मध्ये सेबीने याबाबत पहिले परिपत्रक जारी केले होते. त्यावेळी 31 मार्च 2023 ही अंतिम तारीख देण्यात आली होती. मात्र अनेकांनी नॉमिनीची नावे निश्चित केली नव्हती. त्यामुळे ही दिनांक पुन्हा वाढवण्यात आली. आता 30 सप्टेंबरपर्यंत ही तारीख वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या नॉमिनीचे नाव निश्चित करणे गरजेचे आहे.

काय नुकसान होणार?

जर अंतिम तारखेपर्यंत तुम्ही नॉमिनीचे नाव दिले नाही तर तुमचे फोलिओ गोठवले जाण्याची शक्यता आहे. डेबिट फ्रिझिंग टाळण्यासाठी तुमच्याकडे फक्त दोन पर्याय आहेत. यामध्ये नामनिर्देशन देणे म्हणजे नॉमिनीचे नाव निश्चित करणे गरजेचे आहे. जर तुम्हाला कुणालाही नॉमिनी करायचे नसेल तर तुमच्याकडे यासाठीचा एक फॉर्म भरून द्यावा लागेल.

संयुक्त खाते असलेल्या व्यक्तींसाठी देखील हाच नियम आहे. एकापेक्षा जास्त व्यक्तींनी खरेदी केलेल्या म्यूच्युक फंडसाठी सर्वांना एकत्र येऊन नॉमिनीचे नाव द्यावे लागेल. अन्यथा तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

Phone Charging: फोन चार्ज करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा आग लागू शकते

SCROLL FOR NEXT