Mutual Fund Investment Saam TV
बिझनेस

Mutual Fund Investment : म्युच्युअल फंड तुम्हाला मालामाल करेल, काही चुकांपासून दूर राहा, फायदा नक्की होईल

mutual fund investment tips in marathi : म्युच्युअल फंड खरेदी करण्यास इच्छुकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. या फंडापासून चांगली बचत करू शकता.

Vishal Gangurde

मुंबई : महागाईच्या काळात अनेक जण पैशांची बचत करण्याचा विचार करत असतो. अनेकांना बचतीतून भविष्य सुरक्षित करायचं असतं. आजकाल अनेक कंपन्या पैशांची बचत करण्यासाठी अनेक पर्याय सुचवत असतात. अनेक जण म्युच्युअल फंडात पैसा लावून sip सुरु करतात. काही जण या स्वरुपात कंपन्यांमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यानंतर काही चुका करतात. या चुका खरंतर टाळल्या पाहिजे.

म्युच्युअल फंड म्हणजे काय रे भाऊ?

म्युच्युअल फंड हा गुंतवणुकीचा एक पर्याय आहे. अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडाचा पर्याय सुचवत असतात. म्युच्युअल फंडाच्या पैशांचा वापर उद्योजक हा त्याच्या उद्योगात वापरतो. उद्योगात किती फायदा झाला, यावरून उद्योजक गुंतवणूकदारांना परतावा देतो. म्युच्युअल फंडात व्यक्ती लघु आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकतो.

अनेकांना दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. कारण लघु काळासाठी केलेल्या गुंतवणुकीत जास्त फायदा मिळत नाही. कंपनीत एखाद्या वर्षी केलेल्या गुंतवणुकीचा परतावा अधिक मिळतो. तर एखाद्या वर्षी परतावा कमी मिळतो. यामुळे दीर्घकाळासाठी केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते.

तुम्ही २० वर्षांत १ कोटी रुपये जमा करू इच्छित आहात. तर तुम्ही महिन्याला १००० हजार रुपयांच्या गुंतणुकीनेही सुरुवात करू शकता. तसेच फंडात थेट एक लाखांचीही गुंतवणूक करू शकता. तुमची गुंतवणुकीची रक्कम अधिक असेल, तर भविष्यात फायदेशीर ठरते. या गुंतवणुकीतून अधिक परतावा मिळतो.

तुम्ही चांगल्या गुंतवणुकीसाठी एसआयपी सुरु शकता. तर तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करू शकता. अनेक जण दोन वर्ष गुंतवणूक केल्यानंतर जमा झालेली रक्कम काढून घेतात. फंडात केलेली गुंतवणूक वारंवार काढत असाल तर त्याचा गुंतवणुकीवर परिणाम होतो. त्यामुळे गुंतवणुकीनंतर मिळणाऱ्या परताव्यावर त्याचा परिणाम होते. त्यामुळे फंडातून वारंवार पैसे काढणे टाळायला हवे.

टीप : म्युच्युअल फंडात कोणतीही गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT