Mumbai to Varanasi Vande Bharat Sleeper train route and travel time saam tv
बिझनेस

Indian Railways : मुंबई ते वाराणसीचा प्रवास होणार अवघ्या तासांत! १२ तासांचा वेळ वाचणार?

Vande Bharat Sleeper train : मुंबई ते वाराणसी दरम्यानचा २५ ते ३० तासांचा प्रवास आता अवघ्या १६ ते १८ तासांवर होणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि वेळेची बचत लक्षात घेता, या मार्गावर ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन सुरू करण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

Saam Tv

मुंबईहून उत्तर प्रदेशातील वाराणसीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई ते वाराणसीदरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. ही सेवा सुरू झाल्यास सध्या २४ ते ३० तासांचा असलेला रेल्वे प्रवास अवघ्या १६ ते १८ तासांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांचे तब्बल ८ ते १२ तास वाचू शकतात. मात्र, या प्रस्तावाला अद्याप रेल्वे मंत्रालयाची अधिकृत मंजुरी मिळालेली नाही.

वाराणसीतील पिंडरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अवधेश सिंह यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मुंबई-वाराणसी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची मागणी केली आहे. वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत स्लीपर सेवेच्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला.

मुंबईतील उत्तर भारतीय प्रवाशांना मोठा फायदा

मुंबई आणि परिसरात वाराणसी, जौनपूर, भदोही तसेच उत्तर प्रदेशातील इतर भागांतील हजारो नागरिक नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी वास्तव्यास आहेत. त्यांना वारंवार आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करावा लागतो. सध्याच्या गाड्यांना एका दिवसापेक्षा अधिक वेळ लागत असल्याने जलद रेल्वे सेवेची मागणी होत आहे.

सध्या किती वेळ लागतो?

  • मुंबई ते वाराणसीदरम्यान धावणाऱ्या प्रमुख गाड्यांचा प्रवासाचा अंदाजे...

  • पवन एक्स्प्रेस : २४ तास ५५ मिनिटे

  • एलटीटी-बनारस सुपरफास्ट : २६ तास ४० मिनिटे

  • महानगरी सुपरफास्ट : २७ तास ३० मिनिटे

  • काशी एक्स्प्रेस : ३० तास २५ मिनिटे

प्रस्तावित वंदे भारत स्लीपर ट्रेनला योग्य वेग आणि मर्यादित थांबे मिळाल्यास हा प्रवास १६ ते १८ तासांत पूर्ण होऊ शकतो.

मंजुरी आणि वेळापत्रकाची प्रतीक्षा

मुंबई-वाराणसी वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तिचा मार्ग, थांबे, भाडे आणि सुरू होण्याची तारीखही निश्चित झालेली नाही. रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयानंतरच या सेवेबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.ही ट्रेन सुरू झाल्यास मुंबई आणि उत्तर प्रदेशदरम्यान प्रवास करणारे नोकरदार,विद्यार्थी, व्यावसायिक आणि कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रॅपिडोच्या विरोधात रिक्षा संघटनांचे आंदोलन; मनसेसह विविध पक्षांच्या वाहतूक सेना एकवटणार

Bathroom Vastu Tips: बाथरूममध्ये वॉशिंग मशीन ठेवणं योग्य आहे का? जाणून घ्या वास्तूशास्त्र काय सांगतं? वाचा नियम

Transfer News : पोलीस दलात मोठे फेरबदल! तब्बल २७३ DSP आणि एका IPS अधिकाऱ्याची बदली, कुणाची कुठे झाली नियुक्ती

IND vs NZ 1st Test: भारताने न्यूझीलंडला विजयासाठी दिलं मोठं आव्हान, २३३ धावांची आघाडी; शेवटच्या दिवशी किवींचं काय होणार?

धुळ्यावर शोककळा! देवदर्शनावरून परतताना पवार कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT