MUMBAI CNG PRICE HIKE: MGL RAISES CNG BY ₹2 PER KG, PNG RATES ALSO INCREASED Saam Tv
बिझनेस

Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांचं टेन्शन वाढलं! CNG आणि PNG च्या दरांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या ताजे दर

Mumbai CNG PNG Price Hike Today : मुंबईकरांना पुन्हा महागाईचा फटका. महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपये आणि पीएनजीच्या दरात ५० पैशांची वाढ जाहीर केली आहे. नव्या दरांचा रिक्षा-टॅक्सी चालकांसह सर्वसामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम होणार आहे.

Alisha Khedekar

  • मुंबईत सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ होऊन दर ८६ रुपये झाला आहे.

  • पीएनजीच्या दरात प्रति एससीएम ५० पैशांची वाढ करण्यात आली असून नवा दर ५२ रुपये झाला आहे

  • गेल्या १५ दिवसांत सीएनजीच्या दरात दुसऱ्यांदा वाढ झाली

  • रिक्षा-टॅक्सी संघटनांनी भाडेवाढीची मागणी पुन्हा एकदा जोर धरली आहे

Mumbai CNG PNG Price Hike Today News इराण-अमेरिका संघर्षामुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम आता देशांतर्गत इंधन दरांवरही दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेल आणि CNGच्या किमतीत सातत्याने वाढ होत असून मुंबईकरांना पुन्हा एकदा महागाईचा फटका बसला आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने सीएनजी (CNG) आणि पीएनजी (PNG) च्या दरात वाढ जाहीर केली असून हे नवे दर मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

नव्या दरानुसार सीएनजीच्या (CNG Price Hike Today 2 Ruppes) किमतीत प्रति किलो २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत आता सीएनजीचा दर ८६ रुपये प्रति किलो झाला आहे. (CNG Rate Today Mumbai 86 Per kg) तर घरगुती वापरासाठीच्या पीएनजीच्या दरात प्रति SCM ५० पैशांची वाढ करण्यात आली असून त्याचा नवा दर ५२ रुपये प्रति SCM इतका झाला आहे.(PNG Rate Today 52 Per SCM) विशेष म्हणजे, गेल्या अवघ्या पंधरा दिवसांतील ही सीएनजी दरातील दुसरी वाढ आहे. यापूर्वी १३ मे रोजी देखील सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे अल्पावधीतच सीएनजी चार रुपयांनी महाग झाली आहे. पुणे आणि छत्रपती संभाजीनगरनंतर आता मुंबई आणि नागपूरमध्येही ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.

या वाढीचा सर्वाधिक परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर होणार असल्याचे मानले जात आहे. इंधन खर्च वाढल्याने त्यांचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. आधीच वाढत्या महागाईमुळे अडचणीत असलेल्या चालकांसाठी ही दरवाढ चिंतेची बाब ठरत आहे. अनेक चालक संघटनांनी सरकारकडे आणि संबंधित प्रशासनाकडे भाडेवाढीची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे.

१३ मे रोजी झालेल्या दरवाढीनंतरच रिक्षा-टॅक्सी संघटनांनी प्रति किलोमीटर एक रुपया भाडेवाढ करण्याची मागणी केली होती. आता पुन्हा सीएनजीचे दर वाढल्याने ही मागणी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. संघटनांनी लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे. दरम्यान, सीएनजी आणि पीएनजीच्या वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आणि गृहिणींच्या मासिक बजेटवरही अतिरिक्त ताण पडणार आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर इंधन दरांतील ही वाढ नागरिकांच्या चिंतेत आणखी भर घालत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदेसेनेनंतर भाजप नगरसेवकाची गुंडगिरी, महाडच्या मुख्याधिकाऱ्यांना छत्रीनं मारहाण, अटकेचा फार्स आणि कायद्याचे धिंडवडे

Shahi Tukda Recipe: गोड खाण्याची इच्छा होते? मग झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट शाही तुकडा

Maharashtra News Live Update: खेडमध्ये अतिवृष्टीचा हाहाकार; तिघांचा मृत्यू, एक जण बेपत्ता

Sanju Samson : भारत-इंग्लंड मालिकेदरम्यान संजू सॅमसनचा मोठा निर्णय; अचानक स्पर्धेतून नाव घेतलं मागे; सर्वांनाच आश्चर्याचा धक्का

भीषण अपघात! कार दरीत कोसळली, वाहन बाहेर काढताच आतमध्ये असलेलं घबाड पाहून पोलीसही चक्रावले

SCROLL FOR NEXT