Government Scheme Saam Tv
बिझनेस

Government Scheme: मुलींच्या शिक्षणासाठी सरकार देतंय ५०,००० रुपये; मुख्यमंत्री राजश्री योजना आहे तरी काय?

Mukhyamatri Rajashree Yojana: राजस्थान सरकारने मुलींसाठी खास मुख्यमंत्री राजश्री योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींना शिक्षणासाठी ५०००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

केंद्र सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत.केंद्र सरकारसोबतच इतर अनेक राज्यांच्याही सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, त्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. अशीच एक योजना म्हणजे मुख्यमंत्री राजश्री योजना. राजस्थान सरकारने ही योजना सुरु केली आहे.

मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत व्हावी, या उद्देशातून ही योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींना ५०,००० रुपये दिले जातात.

राजश्री योजना ही २०१६ मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेत मुलींचे पालनपोषण करण्यासाठी मदत केली जाते. या योजनेत ५०,००० रुपये दिले जातात.

पात्रता (Mukhyamantri Rajashree Yojana Eligibility)

मुख्यमंत्री राजश्री योजनेचा लाभ फक्त मुलींनाच मिळतो. मुलगी राजस्थानमधील रहिवासी असावी. मुलीचा जन्म २०१६ नंतर झालेला असावा. तसेच मुलीच्या आईकडे भामाशाह कार्ड असणे गरजेचे आहे.

कुटुंबात फक्त दोन मुलींना हा लाभ मिळतो. यासाठी मुलीच्या १२वीचे कॉलेजचे प्रवेश प्रमाणपत्र, आईवडिलांचे आधार कार्ड, बँक खात्याची माहिती, स्वयं घोषणा पत्र, ममता कार्ड, शाळेचे प्रमाणपत्र, बारावीची मार्कशीट, मोबाईल नंबर, पासपोर्ट साइज फोटो आणि बँक खाते पासबुक गरजेचे आहे.

मुलीच्या शिक्षणासाठी मिळतात पेसै

या योजनेत मुलीच्या जन्मानंतर ते १२वी पास होईपर्यंत पैसे दिले जातात. पहिला हप्ता मुलीच्या जन्मानंतर दिला जातो. २५०० रुपये दिले जातात. दुसरा हप्ता मुलगी एक वर्षाची झाल्यावर दिला जातो. हा २५०० रुपयांचा असतो. त्यानंतर तिसरा हप्ता ४००० रुपयांचा दिला जातो. मुलगी जेव्हा सहावीत जाते तेव्हा ५००० रुपये दिले जातात. पाचवा हप्ता मुलगी १०वीत गेल्यावर दिला जातो. तेव्हा तिला ११,००० रुपये दिले जातात. यानंतर सहावा हप्ता २५००० रुपयांचा असतो. जो मुलगी १२वीत गेल्यावर दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Independence Day : स्वातंत्र्य दिनाला फ्री पिझ्झा? दर तासाला 75 पिझ्झा फ्री मिळणार?

President Droupadi Murmu: संविधान, लोकशाही....ऑपरेशन सिंदूर ते पहलगाम हल्ला; राष्ट्रपतींच्या संबोधनातील ठळक मुद्दे

Ladki Bahin Yojana : लाखो घरांमध्ये तीन लाडक्यांना लाभ, संभाजीनगरात तब्बल 84 हजार अर्ज; हजारो लाडकींचे अर्ज रडारवर

Shocking : कोचिंग क्लासमधील मुलीवर नराधमाची वाईट नजर; शिक्षक-विद्यार्थिनीचा प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, परिसरात खळबळ

Crime News : धक्कादायक! मुतखड्याचं ऑपरेशन, डॉक्टरांनी तरूण शेतकऱ्याची किडनीच गायब केली

SCROLL FOR NEXT