Mukhyamantri Rajshree Yojana Saam Tv
बिझनेस

Mukhyamantri Rajshree Yojana: मुलींच्या जन्मापासून मिळणार ₹५०,०००; काय आहे सरकारची योजना, कोणाला मिळणार लाभ?

Mukhyamantri Rajshree Yojana News: राजस्थान सरकारने मुख्यमंत्री राजश्री योजना सुरु केली आहे. या योजनेत मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. मुलीच्या जन्मापासून ते १२वीपर्यंत ५०,००० रुपये दिले जातात.

Siddhi Hande

राजस्थान सरकारची मुख्यमंत्री राजश्री योजना

मुलींना मिळतात ५०,००० रुपये

जन्मापासून ते १२वीपर्यंत दिली जाते आर्थिक मदत

केंद्र सरकारने महिलांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. केंद्र सरकारसोबत विविध राज्य सरकारने मुलींसाठी अनेक योजना राबवल्या आहे. या योजनांमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत केली जाते. अशीच एक योजना राजस्थान सरकारने सुरु केली आहे. या योजनेत महिलांना ५०,००० रुपये दिले जातात. मुलींच्या शिक्षणाचा खर्च आणि आर्थिक मदत करण्यासाठी ही योजना राबवली आहे.

राजस्थान सरकारने मुलांसाठी मुख्यमंत्री राजश्री योजना राबवली आहे. या योजनेत मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतचा खर्च सरकार करते. या योजनेत सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी मंजुर केला आहे.

मुख्यमंत्री राजश्री योजनेचे मूख्य उद्दिष्ट मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हे आहे. मुलींना चांगले शिक्षण मिळावे,यासाठी ही योजना सुरु केली आहे. मुलींना स्वतः च्या पायावर उभं राहावी, हे यामागचे उद्दिष्ट आहे. राजस्थान सरकारने २०१६ मध्ये योदना सुरु केली आहे.

मुख्यमंत्री राजश्री योजनेत मुलीच्या जन्मापासून ते १२वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत ५० हजार रुपये दिले जातात. हे पैसे थेट मुलींच्या खात्यात जमा केले जातात. या योजनेचा लाभ फक्त राजस्थानमधील मुली घेऊ शकतात. ज्या मुलींचा जन्म २०१६ नंतर झाला आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळत आहे.

किती पैसे मिळणार?

राजश्री योजनेअंतर्गत निकषात बसणाऱ्या मुलींना पैसे दिले जाणार आहे. मुलींच्या जन्मावेळी २,५०० रुपये दिले जातात.मुलगी १ वर्षाची झाल्यावर २५०० रुपये दिले जातात. मुलीचे शाळेत अॅडमिशन झाल्यावर ४००० रुपये आणि मुलगी सहावीत गेल्यावर ५००० रुपये दिले जातात. मुलगी १०वीत गेल्यावर ११००० रुपये दिले जातात. यानंतर मुलगी १२वी पास झाल्यानंतर २५००० रुपये दिले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT