Ladki Bahin Yojana Ekyc Update GOOGLE
बिझनेस

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ...तर eKYC पुन्हा सुरू करणार; मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Ladki Bahin Yojana Ekyc Update: लाडकी बहीण योजनेतल्या पात्र महिलांची केवायसी राहिली असेल तर सरकार पुन्हा केवायसी विंडो सुरु करेल अशी चर्चा सर्वत्र पसरत आहे. पुढील माहितीत सत्य घ्या जाणून.

Sakshi Sunil Jadhav

Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सर्वच महिलांसाठी महत्वाची ठरली. यामध्ये महिन्याला १५०० रुपये महिलांच्या खात्यात पाठवले जात होते. मात्र काही महिलांना याचा लाभ घेता येत नव्हता. तर अपात्र महिलांना तो लाभ मिळत होता. सरकारने याचं ईकेवायसी प्रक्रियेच्या मदतीने संशोधन केलं. तर जे अपात्र ठरले त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येईल असं सांगितलं. पण काही लाडक्या बहिणींनी ईकेवायसी केली नव्हती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महत्वाची माहिती सांगितली आहे.

लाडक्या बहीणीचा लाभ हा महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच महिलांनी घेतला. ई केवायसी केल्यानंतर ८० लाख महिलांना वगळण्यात आलं. यामध्ये जवळपास २८ लाख महिलांची ईकेवायसी चुकली असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वाची दिली आहे.

ज्या महिलांनी केवायसी पूर्ण केली नाही किंवा ज्या महिला अपात्र आहे त्यांचा हप्ता थांबवण्यात आला आहे. तसेच पात्र असूनही केवायसी राहीली असेल तर सरकार पुन्हा एकदा केवायसीची सुविधा उपलब्ध करून द्यायला तयार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, "पात्र महिलांचं कोणतंही नुकसान होऊ देणार नाही. ज्या महिलांची केवायसी राहिली आहे, त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा विंडो सुरू करण्यासाठी तयार आहोत," असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

मे महिन्याचा हप्ता कधी येणार? (When will Ladki Bahin May installment be credited)

सध्या लाडक्या बहिणीचं मे महिन्याचा हप्ता कधी येईल? याकडे लक्ष लागलं आहे. पण अजुनही याबद्दल कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. तर मार्च- अप्रिल महिन्याचा हप्ता हा १५ मे रोजी खात्यात जमा झाला होता. त्यामुळे मे महिन्याचाही हप्ता याच दरम्यान येईल अशी शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Skin Care : वय कमी, पण चेहऱ्यावरून दिसता म्हातारे; रात्रीच्या ३ चुका ठरताहेत कारणीभूत

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन

Pithla Bhakri Recipe: थंडीत गरमागरम जेवणासाठी झटपट बनवा झणझणीत पिठलं-भाकरी, वाचा रेसिपी

Famous Director Death: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; बाथरुममध्ये पडल्यामुळे दुर्दैवी मृत्यू

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत महिलांना ४० हजार रुपये मिळणार? सरकारने केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT