Ambani Adani Net Worth  Saam Tv
बिझनेस

Ambani Adani Net Worth: अर्थसंकल्पापूर्वीच अंबानी अदानी यांच्या संपत्तीत वाढ, टॉप 10 अब्जाधीशांच्या संपत्तीत झाली मोठी घट

Ambani Adani Net Worth Hike: अर्थसंकल्पापूर्वीच अंबानी अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाल्याची माहिती मिळतेय. तर इतर टॉप 10 अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mukesh Ambani And Gautam Adani

अर्थसंकल्प (Budget) येण्यापूर्वीच उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani Net Worth) आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने ही आकडेवारी दिलीय. मिळालेल्या आकडेवारीनुसार दोघांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. (Latest Marathi News)

मायक्रोसॉफ्टच्या संस्थापकांच्या संपत्तीत एकत्रितपणे 16 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जगातील टॉप 20 अब्जाधीशांपैकी फक्त अंबानी आणि अदानी (Gautam Adani Net Worth) यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. यांच्या संपत्तीत किती वाढ झालीय, हे आपण सविस्तर जाणून घेऊ या. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंबानींच्या संपत्तीत वाढ

आशियातील टॉप 20 अब्जाधीशांमध्ये उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या संपत्तीत सर्वाधिक वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सच्या वाढीमुळे 1.42 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 12 हजार कोटी रुपयांची नेट वर्थ वाढली आहे. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 106 अब्ज डॉलर झाली आहे. चालू वर्षात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत 9.11 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. मुकेश अंबानी सध्या जगातील 11 वे सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत.

अदानींच्याही संपत्तीत वाढ

अर्थसंकल्प सादर होण्याअगोदर अदानीच्या (Gautam Adani) संपत्तीतही वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार 825 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 6800 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 95.9 अब्ज डॉलर झाली आहे. टॉप 20 अब्जाधीशांमध्ये आणखी काही अब्जाधीश आहेत, ज्यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. सध्या अदानी जगातील 14 व्या क्रमांकाचा श्रीमंत उद्योगपती आहे. या वर्षी त्यांच्या संपत्तीत 11.6 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे.

जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट

जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या संपत्तीत घट झाली (Ambani Adani Net Worth) आहे. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक लॅरी पेज यांच्या संपत्तीत 8.81 अब्ज डॉलर्स आणि सेर्गे ब्रिन यांच्या संपत्तीत 8.28 अब्ज डॉलरची सर्वात मोठी घट झाली.

जेफ बेझोस, स्टीव्ह बाल्मर, मार्क झुकेरबर्ग आणि एलोन मस्क यांच्या संपत्तीत ३ अब्ज डॉलरची घट झाली आहे. लॅरी एलिसन आणि बर्नार्ड अर्नॉल्ट यांच्या संपत्तीत 2 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त घट झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

Marathi bhasha Vijay Live Updates : मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, दादरमधील वातावरण तापलं

Thackeray Brothers Reunion : १९ वर्षांनंतर राज-उद्धव एकाच मंचावर, राज्यभरातून कार्यकर्ते दाखल, ठाकरेंच्या टीकेचा बाण कुणावर?

SCROLL FOR NEXT