तेलंगणाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एका सरकारी अधिकाऱ्याकडून सुमारे 100 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी तेलंगणा राज्य रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (TSRERA) चे सचिव आणि मेट्रो रेल्वेचे नियोजन अधिकारी एस. बालकृष्ण यांच्या विविध जागांवर एकाच वेळी छापेमारी केली.
एस बालकृष्ण यांनी सरकारच्या विविध पदांवर काम केलं आहे. याआधी ते हैदराबाद मेट्रोपॉलिटन डेव्हलपमेंट अथॉरिटी (HMDA) मध्ये नगर नियोजन संचालक म्हणून कार्यरत होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
बुधवारी दिवसभर लाचलुचपत प्रतिबंधक यंत्रणेच्या 14 पथकांची शोधमोहीम सुरू होती आणि गुरुवारी पुन्हा सुरू ही शोधमोहीम सुरु होण्याची शक्यता आहे. बालकृष्ण यांच्या घरावर, कार्यालयांवर, त्यांच्या नातेवाईकांच्या जागेवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले, ज्यात 100 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आली. (Latest Marathi News)
आतापर्यंत सुमारे 40 लाख रुपये रोख, 2 किलो सोने, इतर मालमत्तांची कागदपत्रे, 60 महागडी घड्याळे, 14 मोबाइल फोन आणि 10 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. अधिकाऱ्याचे बँक लॉकर्स अद्याप उघडलेले नाहीत. एसीबीने किमान चार बँकांमधील लॉकरची माहिती मिळवली आहे.
एसीबीच्या अधिकाऱ्यांना बालकृष्ण यांच्या निवासस्थानी नोटा मोजण्याचे यंत्र सापडले आहे. एचएमडीएमध्ये कार्यरत असताना त्यांनी ही संपत्ती गोळा केली असल्याचा संशय एसीबीला आहे. सध्या सुरू असलेल्या शोधमोहिमेत आणखी मालमत्ता सापडण्याची शक्यता आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.