MOTOROLA MOTO G67 POWER 5G LAUNCHED IN INDIA Saam Tv
बिझनेस

Moto G67 Power 5G Launched: अडीच बॅटरी बॅकअप, 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग, ५० मेगापिक्सेल कॅमेरा; दमदार फीचरवाला Moto चा G67 Power 5G लाँच

5G Smartphone: मोटोरोलाने भारतात Moto G67 Power 5G सादर केला असून यात स्नॅपड्रॅगन 7s Gen 2, 120Hz डिस्प्ले, 50MP Sony कॅमेरा आणि 7000mAh बॅटरीचा समावेश आहे.

Dhanshri Shintre

  • मोटोरोलाने भारतात Moto G67 Power 5G फोन लाँच केला.

  • या फोनमध्ये २४ जीबीपर्यंत रॅम आणि ७०००mAh बॅटरी दिली आहे.

  • Snapdragon 7S Gen 2 चिपसेट आणि 50MP कॅमेऱ्याचा समावेश आहे.

  • फोनची किंमत 14,999 रुपयांपासून सुरू असून विक्री 12 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे

मोटोरोला कंपनीने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन ‘Moto G67 Power 5G’ लाँच केला आहे. हा फोन दमदार फीचर्ससह आला असून 24 जीबीपर्यंत रॅम आणि तब्बल ५८ तासांपर्यंतचा बॅटरी बॅकअप देतो. या फोनची रचना, परफॉर्मन्स आणि कॅमेऱ्याच्या गुणवत्ता लक्षात घेता तो मध्यम बजेटमधील ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरणार आहे.

या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7S जनरेशन २ चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. जो उत्कृष्ट प्रोसेसिंग स्पीड देतो. यामध्ये 6.7 इंचांचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असून त्याचा रिफ्रेश रेट १२०hz आहे. स्क्रीनचे संरक्षण कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i देत असून त्यामुळे स्क्रॅच आणि ग्लास तुटण्यापासून सुरक्षितता मिळते.

कॅमेऱ्याच्या बाबतीत, रिअर पॅनेलवर 50 मेगापिक्सेलचा सोनी LYT 600 सेन्सर आणि ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स दिला आहे. या दोन्ही कॅमेऱ्यांनी 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग शक्य आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला असून तो अत्यंत स्पष्ट आणि रंगीत फोटो देतो. फोनची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्याची 7000mAh क्षमतेची बॅटरी जी कंपनीच्या मते एका चार्जवर ५८ तासांपर्यंत वापरता येते. इतकाच नव्हे तर यात टर्बो चार्जिंगचा सपोर्टही दिला आहे.

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Moto G67 Power 5G चा ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेला व्हेरियंट १५,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. लाँच ऑफर अंतर्गत या बेस व्हेरियंटची किंमत १४,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेला टॉप मॉडेलही लवकरच बाजारात येईल अशी अपेक्षा आहे.

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटसोबतच हा फोन फ्लिपकार्टवर १२ नोव्हेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. या किंमतीत हा स्मार्टफोन Vivo T4X 5G, Oppo K13 5G, Infinix Note 50S Plus, iQOO Z10X 5G, Poco X7 5G आणि Realme P3 5G यांसारख्या मॉडेल्सना जोरदार स्पर्धा देणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : काँग्रेस आणि ठाकरे गटाला कोकणात मोठा धक्का; ३ बड्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Ind vs SA: भारतीय कसोटी संघाची घोषणा, दुसरं मोठं संकट परतवून लावणाऱ्या धाकड क्रिकेटपटूची एन्ट्री, दोघांना बाहेरचा रस्ता

Vasai-Virar Tourism : स्वच्छ वाळू अन् हिरवेगार वातावरण, 'हा' आहे वसईजवळील शांत समुद्रकिनारा

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर

Solapur Reelstar Couple: प्रत्येक नवरा-बायकोनं बघावी अशी लव्ह स्टोरी! सोलापूरच्या कपलची संघर्ष कहाणी साऊथमध्ये झळकणार, VIDEO बघून डोळ्यात येईल पाणी

SCROLL FOR NEXT