Investment Tips Saam TV
बिझनेस

Investment Tips: फक्त ३० रुपयांच्या सेविंगने व्हाल करोडपती; मालामाल होण्याचा सिंपल फंडा

Millionaire By Investing Rs.30: सध्या तुम्ही २० वर्षांचे असाल तर तुम्ही दिवसाला फक्त ३० रुपये साठवायला सुरुवात करा. दिवसाला ३० रुपये साठवल्यास महिन्याला तुमच्याकडे ९०० रुपये जमा होतात.

Ruchika Jadhav

Investment Tips:

गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येक व्यक्तीला आपल्या आर्थीक परिस्थितीचा आलेख चढत्या क्रमातच असावा असं वाटतं. यासाठी सध्या बँक, पोस्ट ऑफिससह शासनाच्या विविध योजनांमध्ये व्यक्ती पैशांची गुंतवणूक करतात. आता तुम्ही जर करोडपती व्हायचं स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण यामध्ये आम्ही तुम्हाला कमी गुंतवणूक करूनही करोडपती होण्याचा एक फॉम्युला सांगणार आहोत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुम्हाला कमी दिवसांत जास्त श्रीमंत व्हायचं असेल तर त्यासाठी कमीत कमी वयापासून सुरुवात करायला हवी. सध्या तुम्ही २० वर्षांचे असाल तर तुम्ही दिवसाला फक्त ३० रुपये साठवायला सुरुवात करा. दिवसाला ३० रुपये साठवल्यास महिन्याला तुमच्याकडे ९०० रुपये जमा होतात. या पैशांची तुम्ही SIP सुरू करू शकता. या SIP (Systematic Investment Plan) मध्ये गुंतवणुकीचा कालावधी ४० वर्षांसाठी सिलेक्ट करा. अशा गुंतवणुकीमुळे तुम्ही एक दिवस करोडपती व्हाल.

पैशांचं गणित निट समजून घेऊ

दिवसाला ३० रुपये वाचवले म्हणजे महिन्याचे झाले ९०० रुपये. महिन्याला ९०० रुपये साठवले म्हणजे एका वर्षात तुमच्याकडे १०,८०० रुपये जमा होतील. ४० वर्षांच्या मुदतीनुसार ही रक्कम ४,३२,००० रुपये इतकी होईल. आता म्युच्युअल फंडात तुम्ही हे पैसे साठवत असाल तर तुम्हाला १२.५ टक्के दराने व्याज मिळते. त्यामुळे ४० वर्षांत तुम्ही नक्कीच कोट्यावधींचे मालक व्हाल.

जर तुम्ही ३० वर्षांचे असाल आणि तुम्ही अद्यापही गुंतवणूक सुरू केली नसेल तर आजच सुरु करा. यासाठी म्युचल फंडमध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी तुम्हाला दिवसाला ९५ रुपयांची बचत करावी लागेल. ही गुंतवणूक ३५ वर्षांपर्यंत करावी. डिव्हिडंड रीइन्व्हेस्टमेंट प्लॅानमध्ये गुंतवणूक केल्यास यावर १५ टक्के परतावा मिळतो. जास्तीत जास्त इंटरेस्ट मिळणाऱ्या योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला बराच फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT