whatsapp  Saam Tv News
बिझनेस

तुमचं WhatsAPP कुणीतरी वाचतंय? लीक झालेल्या डेटात तुमचाही नंबर? VIDEO

WhatsAPP nes : तुम्ही वॉट्सअप वापरत असाल तर तुमची चिंता वाढवणारी बातमी... व्हॉट्सअॅपमध्ये सुमारे ३.५ अब्ज लोकांच्या फोन नंबर आणि त्यांच्या प्रोफाइल माहितीची चोरी झालीय. डेटा चोरीत नेमका कशाचा समावेश आहे? ही चूक का झाली? यावर मेटाने काय स्पष्टीकरण दिलंय? चला जाणून घेऊया सविस्तरपणे या खास रिपोर्टमधून....

Saam Tv

व्हॉट्अप.. तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच रोजच्याच जगण्यातला अविभाज्य घटक....याच व्हॉट्सअपबद्दल एक धक्कादायक माहिती समोर आलीय. जगातल्या निम्मे युजर्सचे फोन नंबर आणि प्रोफाइलची लीक झाल्याचं समोर आलंय. हा आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या डेटा लीकपैकी एक मानला जातोय.

सगळ्यात सुक्षित डिजीटल सोशल मिडीयापैकी एक अशी वॉट्सअपची ओळख आहे. भावा बाकी काहीही हॅक होऊ शकतं पण वॉट्सअप नाही! ते जाम सिक्युअर आहे! असं अनेकदा आपण ऐकलंय. पण आता याच वॉट्सअपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं बोललं जातंय. ऑस्ट्रियातील व्हिएन्ना विद्यापीठातील सुरक्षा संशोधकांना व्हॉट्सअॅपच्या 'कॉन्टॅक्ट डिस्कव्हरी' फीचरमध्ये एक गंभीर चूक आढळली. हे फीचर युजर्सना त्यांच्या फोनमधील कॉन्टॅक्ट्सपैकी कोण व्हॉट्सअॅपवर आहे हे शोधायला मदत करते.

कसा झाला व्हॉट्सअॅपचा डेटा लीक?

1- व्हॉट्सअॅपच्या कॉन्टॅक्ट डिस्कव्हरी यंत्रणेत रेट लिमिट नव्हती

2- युजर्स एकाच वेळी कितीही नंबर तपासू शकतात

3- या फीचरचा गैरफायदा घेत अब्जावधी नंबर्सची तपासणी

4- जगातील सुमारे 57% युजर्सचे प्रोफाइल फोटो आणि 29% युजर्सचा प्रोफाइल मजकूर लीक

आता ही चूक दुरुस्त करण्यात आल्याचा दावा मेटानं केलाय. आणि याचा गैरवापर झाल्याचे कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. कंपनीच्या मते, जे फोन नंबर आणि प्रोफाइल फोटो सार्वजनिक सेटिंगमध्ये ठेवलेले होते, तीच माहिती उघड झाली आहे आणि ही माहिती व्हॉट्सअॅपवर आधीपासूनच सार्वजनिकरित्या उपलब्ध असते. असो... तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी उपद्रवी लोंकांकडे कायम एक वाट उघडी असते. युजर्सने स्वत:ला डिजीटली सुरक्षित बनवणं याचसाठी महत्वाचंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gen Z Shortforms : Gen - Z जे ट्रेंडी शब्द वापरतात त्याचा फुल फॉर्म नेमका काय? जाणून घ्या

kadipatta chutney: कढीपत्त्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी; चव आणि आरोग्य दोन्हींसाठी फायदेशीर

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात न्यायालयाने काढलेले समन्स रद्द

Accident : मजुरांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला एसटीची धडक, २ महिलांचा जागीच मृत्यू; ५ गंभीर

Maharashtra Politics: मोठी बातमी! सर्व महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार, भाजप-शिवसेनेतील वाद मिटला

SCROLL FOR NEXT