Bitcoin fall Saam tv
बिझनेस

Bitcoin fall : टॅरिफ बॉम्बमुळे जगात हाहाकार, शेअर बाजारच नाही Bitcoin ही पडले, आता किती झाली किंमत?

Bitcoin price falls : टॅरिफ बॉम्बमुळे जगात हाहाकार माजलाय. शेअर बाजारच नव्हे, तर बिटकॉइनची किंमती देखील पडल्या आहेत.

Vishal Gangurde

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड यांच्या टॅरिफ धोरणाचा परिणाम केवळ शेअर बाजारावरच झालेला नाही. तर रुपया आणि प्रति बॅरल कच्च्या तेलाच्या किंमतीही घसरल्या आहेत. दुसरीकडे क्रिप्टो मार्केटवरही मोठा परिणाम झाला आहे. विशेष म्हणजे बिटकॉइनच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे. बिटकॉइनच्या किंमतीत आज ४ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. मागील पाच दिवसांत बिटकॉइनच्या किंमतीत ९.०८ टक्के आणि आतापर्यंत १९.८२ टक्के दर घसरण झाली आहे. या वर्षीच्या सुरुवातीच्या महिन्या क्रिप्टो करंन्सीने उच्चांक गाठला होता.

डोनाल्ड ट्रम्प क्रिप्टो समर्थक आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे निवडणुकीत जिंकल्यानंतर बिटकॉइनच्या किमती वाढल्या होत्या. जानेवारी ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेताना बिटकॉइनची किंमत ११०,००० डॉलरपर्यंत उच्चांकी स्तर गाठला आहे. आता बिटकॉइन ७४,९२४.७३ डॉलर किंमतीवर उपलब्ध आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची खुर्ची सांभाळण्यासाठी क्रिप्टोसाठी अनेक पावले उचलले होते. मात्र, टॅरिफबाबत घेतलेल्या निर्णयाचा रोष अमेरिकन नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. ट्रम्प यांच्या धोरणामुळे क्रिप्टो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळत आहे.

पारंपरिक बाजाराच्या तुलनेत बिटकॉइनचं मार्केट संवेदनशील आहे. तज्ज्ञांच्या मते ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकेवर मंदीचं संकट येऊ शकतं. या धोरणामुळे क्रिप्टो बाजारावरही परिणाम झाला आहे. कॅप्रियोल इन्व्हेस्टमेंट्सचे संस्थापक चार्ल्स एडवर्ड्स यांच्या म्हणण्यानुसार, आयातशुल्क हे अपेक्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे गुंतवणूकदार गोंधळात सापडले आहेत. पुढील काही आठवडे बिटकॉइनसाठी महत्वाचे असतील. बिटकॉइन ९१००० डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच ७१००० डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचा शेअर बाजार आणि बिटकॉइनच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून पडझड पाहायला मिळत आहे अमेरिकेतील गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी बिटकॉइनबाबत भविष्यवाणी केली आहे की, बिटकॉइनची किंमत २०,००० डॉलर होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिकेत मंदी आल्यास क्रिप्टोकरंन्सी असलेल्या बिटकॉइनवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

SCROLL FOR NEXT